For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नॅट सायव्हर-ब्रंट डब्ल्यूपीएलमधील पहिली शतकवीर

06:55 AM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
नॅट सायव्हर ब्रंट डब्ल्यूपीएलमधील पहिली शतकवीर
Advertisement

आरसीबीवर 15 धावांनी विजय, हेली मॅथ्यूजची अष्टपैलू चमक, रिचा घोषचे प्रयत्न अपुरे

Advertisement

वृत्तसंस्था/ बडोदा

सामनावीर नॅट सायव्हर ब्रंटने नोंदवलेले नाबाद शतक आणि हेली मॅथ्यूजची अष्टपैलू कामगिरी यांच्या बळावर मुंबई इंडियन्स महिला संघाने येथे झालेल्या रोमांचक सामन्यात आरसीबीचा केवळ 15 धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याचे आव्हान कायम ठेवले. आरसीबीच्या रिचा घोषने केलेली 90 धावांची खेळी मात्र वाया गेली. नॅट सायव्हर ब्रंट ही डब्ल्यूपीएलच्या इतिहासातील पहिली शतकवीर ठरली आहे.

Advertisement

प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्याचे आव्हान कायम ठेवण्यासाठी विद्यमान विजेत्या मुंबईला हा सामना जिंकणे आवश्यक होते. प्रथम फलंदाजी मिळाल्यावर मुंबईने 20 षटकांत 4 बाद 199 धावा जमविल्या. त्यानंतर आरसीबीची स्थिती पावरप्लेमध्येच 5 बाद 35 अशी केविलवाणी झाली होती. पण नंतर रिचा घोषने आक्रमक फटकेबाजी करीत एक संस्मरणीय खेळी केली. तिने केवळ 50 चेंडूत 10 चौकार, 6 षटकारांच्या मदतीने 90 धावा झोडपल्याने आरसीबीला विजयाची संधी निर्माण करून दिली होती. शेवटच्या दोन षटकांत आरसीबीने 43 धावा चोपून काढल्या. पण रिचाने अमनजोतच्या षटकांत सलग तीन षटकार ठोकले. पण त्यांना अखेर 9 बाद 164 धावांवर रोखत मुंबईने 15 धावांनी विजय मिळविला. रिचा शेवटच्या चेंडूवर बाद झाली. आरसीबीच्या डावात नादिन डी क्लर्कने 28, ग्रेस हॅरिसने 15, अरुंधती रे•ाrने 14 व श्रेयांका पाटीलने नाबाद 12 धावा केल्या.

मुंबईच्या हेली मॅथ्यूजने 10 धावांत 3 बळी घेत मोलाची कामगिरी केली. तिला शबनिम इस्माईल व अमेलिया केर यांनी प्रत्येकी 2 बळी घेत पूरक साथ दिली. त्याआधी फलंदाजीत मॅथ्यूजने सजीवन सजना 7 धावा काढून बाद झाल्यानंतर सायव्हर ब्रंटसमवेत दुसऱ्या गड्यासाठी 73 चेंडूत 131 धावांची भागीदारी केली होती. मॅथ्यूजने 39 चेंडूत 9 चौकारांच्या मदतीने 56 धावा फटकावल्या तर सायव्हर ब्रंटने 57 चेंडूत 16 चौकार, एका षटकारासह नाबाद 100 धावा फटकाविल्या.

संक्षिप्त धावफलक : मुंबई इंडियन्स महिला संघ 20 षटकांत 4 बाद 199 : हेली मॅथ्यूज 39 चेंडूत 56, नॅट सायव्हर ब्रंट 57 चेंडूत नाबाद 100, हरमनप्रीत कौर 12 चेंडूत 20, अवांतर 11. लॉरेन बेल 2-21, नादिन डी क्लर्क 1-40, श्रेयांका पाटील 1-34.

आरसीबी महिला संघ 20 षटकांत 9 बाद 164 : रिचा घोष 50 चेंडूत 90, नादिन डी क्लर्क 20 चेंडूत 28, अरुंधती रे•ाr 14, श्रेयांका पाटील नाबाद 12, हॅरिस 15. हेली मॅथ्यूज 3-10, शबनिम इस्माईल 2-25, अमनजोत कौर 1-51, अमेलिया केर 2-37

Advertisement
Tags :

.