Solapur News | नसरापूर अत्याचार प्रकरणाने सोलापूर पेटले! नराधमाला फाशी द्या, सकल हिंदू समाजाची मागणी
02:59 PM May 05, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
सोलापूरच्या रस्त्यांवर उतरला जनसागर,
Advertisement
सोलापुर - नसरापूर येथे त्या नराधमाच्या अत्याचारास बळी पडलेली बालिका ही सोलापूरची नात असून याप्रकरणी त्या नराधमास तत्काळ फाशी देण्यात यावी अशी एक मुखी मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीने करण्यात आली.
मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल हिंदू समाजाच्या वतीने निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चासाठी खासदार डॉक्टर ज्योती वाघमारे, भाजपा शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर,मनपा सभागृह नेते नरेंद्र काळे, मनपा स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेविका संगीता जाधव, चंद्रिका चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
Advertisement
Advertisement