For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

CA Result 2026 सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर, साक्षी जैन देशात पहिली, नाशिकच्या शैक्षणिक इतिहासातला अभिमानास्पद निकाल

04:43 PM Jul 03, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
ca result 2026 सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर  साक्षी जैन देशात पहिली  नाशिकच्या शैक्षणिक इतिहासातला अभिमानास्पद निकाल
Advertisement

नाशिक : प्रतिनिधी

Advertisement

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया अर्थात आयसीएआय कडून मे महिन्यात घेण्यात आलेल्या सीए फाउंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये नाशिकची साक्षी जैन देशात पहिली आली आहे. तिने ४०० पैकी ३७१ गुण मिळवून ९२.७५ टक्क्यांसह देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर उत्कर्ष कैलास वाणी शहरात दुसरा आला असून ४०० पैकी ३४३ गुण आणि अनन्या अतुल माहेश्वरी तिसरी आली आहे. तिला ४०० पैकी ३४० गुण मिळाले आहेत. नाशिक शहरातून यंदा ९८७ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३२५ विद्यार्थी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. संपूर्ण निकाल icai.org आणि icaiexam.icai.org येथे पाहात आणि डाउनलोड करता येणार आहे.

या निकालाबाबत बोलतांना आयसीएआय नाशिक शाखेचे अध्यक्ष सीए अभिजित मोदी यांनी सांगितले की, नाशिकच्या शैक्षणिक इतिहासांमध्ये पहिल्यांदाच असे घडले आहे की सीए फाउंडेशन परीक्षेमध्ये नाशिकचा विद्यार्थी देशात पहिला आला आहे. ही गोष्ट नक्कीच नाशिक शहराला 'एज्युकेशन हब' कडे नेणारी आहे.

Advertisement

मुलींचा वाढता टक्का

पुढे बोलताना मोदी म्हणाले सोबतच निकाला मधला सरासरी मुलींचा टक्का वाढला आहे. याशिवाय नाशिक केंद्राचा निकालही पुणे, मुंबई च्या तुलनेमध्ये अधिक आहे. ही गोष्ट नाशिक आयसीएआयसाठी खूप महत्वाची आहे.हे या निकालाचे वेगळेपण म्हणता येईल. ही परीक्षा म्हणजे देशातील कठीण परीक्षापैकी एक असलेल्या सीए परीक्षेचा हा पहिला महत्वपूर्ण टप्पा आहे.

अभिमानास्पद निकाल

साक्षी जैन यांनी मिळवलेल्या अभिमानास्पद यशाबद्दल बोलताना अभिजीत मोदी म्हणाले "यंदा साक्षी जैनच्या रूपाने नाशिकच्या विद्यार्थीनीने मिळवलेले यश नक्कीच अभिमानास्पद आहे. यातून अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळणार आहे. या परीक्षेत यश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी नेहमीच लक्षात ठेवली पाहिजे

या निकालानंतर आयसीएआय नाशिक शाखेचे उपाध्यक्ष सीए मनोज तांबे, सचिव सीए विशाल वाणी, कोषाध्यक्ष सीए दिलीप बोरसे तसेच वेस्टन इंडिया चार्टर्ड अकाउंटंट स्टुडंट असोसिएशन अर्थात विकासा कमिटीचे चेअरमन सीए रोहन कुलकर्णी, सहसदस्य सीए शुभम मुंदडा, सीए पियुष चांडक उपाध्यक्ष वेस्टन इंडिया रिजनल कौन्सिल आणि कार्यकारिणी सदस्य तसेच माजी अध्यक्ष सीए जितेंद्र फाफट यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Advertisement
Tags :

.