पती, मुलगा, मुलगी, दीर आणि दोन भाच्यांसोबत धरणाजवळील धबधब्यावर कौटुंबिक सहलीला गेलेल्या एका महिलेला दोन तरुणांनी शिट्टी वाजवून त्रास दिला.
महिलेवर हल्ल्याचा आरोप
नाशिक शहरात एका जमावाने महिलेच्या चारचाकी गाडीचा पाठलाग करत दहशत निर्माण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बेसबॉलच्या स्टिक्स आणि लोखंडी रॉड घेऊन नाट्यमय पाठलाग करत या जमावाने गाडीवर हल्ला केला.
विशेष म्हणजे आपल्या कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्या या महिलेच्या चारचाकी गाडीचेही नुकसान केले आहे. दरम्यान नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला असं म्हणायला लावत गुन्हेगारांची वरात काढणाऱ्या पोलीसांचा धाक पूर्णत: संपलाय की काय असा प्रश्न निर्माण करणारी एक घटना नाशिक जिल्ह्यातून समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एका ठिकाणी पर्यटन करन परतताना संबंधित गटाने गाडी थांबवून महिलेचा विनयभंग केला आणि तिच्या पतीला मारहाण केली. घटनास्थळावरून निघाल्यानंतर कुटुंबीयांनी इगतपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि घटनेचा व्हिडिओ पोलिसांना सादर करत तक्रार दाखल केली.
विनयभंग, मारहाण आणि दरोड्याचा गुन्हा
जमावाविरुद्ध विनयभंग, हत्येचा प्रयत्न आणि दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांनी सांगितले की, या घटनेप्रकरणी नऊ जणांना अटक करण्यात आली असून, ते सर्व गिरनारे, नांदगाव साडो आणि माणिकखंब या गावांतील आणि इतर जवळपासच्या भागांतील आहेत.
पती, मुलगा, मुलगी, दीर आणि दोन भाच्यांसोबत धरणाजवळील धबधब्यावर कौटुंबिक सहलीला गेलेल्या एका महिलेला दोन तरुणांनी शिट्टी वाजवून त्रास दिला.
महिलेवर हल्ल्याचा आरोप
घटनेनंतर तिच्या कुटुंबीयांनी हस्तक्षेप केला, तक्रारदार महिलेने केलेल्या आरोपानुसार तरुणांच्या जमावाने कुटूंबावर हल्ला केला आणि महिलेचे कपडे फाडले.
पोलिसांकडे केलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी महिलेचा मोबाईल फोनही घेतला आणि जेव्हा तिच्या पतीने तो परत मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी त्याच्या गळ्यातील २० ग्रॅम सोन्याची साखळी हिसकावून घेतली आणि त्याला मारहाण केली, असे पीटीआयने वृत्त दिले आहे.
.