For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Ajara News | आजऱ्यातील अरुंद रस्ते आणि जुनी घरे बनली मृत्यूचा सापळा; प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह

01:42 PM Apr 22, 2026 IST | NEETA POTDAR
ajara news   आजऱ्यातील अरुंद रस्ते आणि जुनी घरे बनली मृत्यूचा सापळा  प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
Advertisement

                  दुर्घटनेनंतर आजरा नगरपंचायत प्रशासन खडबडून जागे

Advertisement

आजरा - आजरा शहरातील वाणी गल्लीतील जुने घर पाडताना झालेल्या दुर्घटनेत एका प्राध्यापिकेसह शाळकरी मुलीला जीव गमवावा लागला. तर एक महिला कायमची जायबंदी झाली आहे. या घटनेमुळे शहरातील थोकादायक घरांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. धोकादायक घरांच्या मालकांना आजरा नगरपंचायत प्रशासनाने गतवर्षी एप्रिल २०२५ मध्ये जवळपास ४० ते ४४ भोकादायक घरांच्या मालकांना नोटीसा लागू केल्या आहेत.

आजरा शहरातील गटर्स व रस्त्यांची कामेही वेगाने सुरू आहेत. काही जुनी गटर्स घुशींनी पोखरली असून अशा गटर्समधील सांडपाणी गटर्स लगतच्या घरांमध्ये मुरत आहे. त्यामुळे अशी घरे कमकुवत होत आहेत. खास करून गटर्स लगत असणाऱ्या घरांना ही समस्या भेडसावत आहे. सोमवारी घडलेल्या दुर्घटनेतील जुने घर पाहण्याचे काम सुरू होते. घर पाडताना ही दुर्घटना घडली आणि पादचाऱ्यांना जीव गमविण्याची वेळ
आली.

Advertisement

शहरातील बहुतांशी रस्ते अरूंद आहेत. आजरा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने कामानिमिताने शहरात ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आजरा शहरात हायस्कूल व कॉलेज असल्याने शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागातून शिक्षणासाठी ये-जा करणाऱ्या शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे.

तालुक्याच्या ग्रामीण भागातून येणारे काही प्रवाशी व विद्यार्थी आजरा पंचायत समिती, आजरा बसस्थानक, सी. डी. फार्म, रवळनाथ राईस मील आदी परिसरात उतरून आपल्या कामाच्या अथवा शाळा, महाविद्यालयाच्या ठिकाणी चालत जातात. त्यामुळे शहरातील सर्वचरस्त्यावरून कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची व विद्यार्थ्यांची सातत्याने वर्दळ असते.सोमवारी घडलेल्या दुर्घटनेतून धडा घेऊन पुन्हा अशी घटना घडूनये यासाठी नगरपंचायत प्रशासनाने खबरदारी घेण्याची गरज यानिमित्ताने पुढे आली आहे. नगरपंचायतीच्या नियमानुसार बांधकाम करताना अनेक अडचणी निर्माण होतअसल्याने नगरपंचायतीची परवानगी न घेताच जुने घर पाहून नव्या इमारती उभारण्याची कामे अनेक ठिकाणी सुरू आहे.

घाई गडबडीत जुनं घर पाहणे, दर्शनी भिंत तशीच ठेवून आतून नवे बांधकाम करण्याचे प्रकारहीअनेक ठिकाणी सुरू आहेत. सुदैवाने आजवर अशी दुर्घटना घडली नव्हती, सोमवारी घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर तरी नगरपंचायत प्रशासनाबरोबरच धोकादाय घर मालकांनी सावधानता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे.

नगरपंचायत प्रशासनाला मर्यादा
शहरातील जुन्या व धोकादायक घरांबाबत नगरपंचायत प्रशासनाने कोणी कारवाई केली याबाबत माहिती घेतली असता प्रत्येक वर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी नगरपंचायत धोकादायक घरांचा सर्व्हे करते. संबंधित घरमालकांना नोटीस देऊन खबरदारी घेण्याच्या सूचना देते. घर ही वैयक्तिक, सामाईक मालमत्ता असते, काही ठिकाणी मोजणीचा वाद, न्यायप्रविष्ट बाबींमुळे थेट कारवाई करताना नगरपंचायत प्रशासनाला मर्यादा येत असल्याचे सांगण्यात आले. गतवर्षीच्या एप्रिल महिन्यात शहरातील जवळपास ४० ते ४४ धोकादायक घरमालकांना नोटीसा लागू केल्या होत्या. यावर्षीही पावसाळ्यापूर्वी धोकादायक घरांचा सर्व्हे करून संबंधित मालकांना नोटीसा लागू करण्याचे काम सुरू असल्याचे नगरपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.