नार्निया : द मॅजिशियन्स नेफ्यू’चा ट्रेलर सादर
फँटसी जगाची होणार वापसी
नेटफ्लिक्सने स्वत:चा आगामी चित्रपट ‘नार्निया :द मॅजिशियन्स नेफ्यू’चा ट्रेलर जारी केला आहे. याच्या माध्यमातून लोकांना सी.एस. लुईसच्या फँटसी जगताची कहाणी पाहता येणार आहे. नेटफ्लिक्सचे युजर्स दीर्घकाळापासून या बहुप्रतीक्षित चित्रपटाची प्रतीक्षा करत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन ग्रेटा गेरविग यांनी केले असून त्यांना बार्बी, लिटिल वुमेन आणि लेडी बर्ड यासारख्या चित्रपटांसाठी ओळखले जाते.
चित्रपटाची कहाणी सी.एस. लुईस यांची मुलांसाठी प्रसिद्ध पुस्तक सीरिज ‘द क्रॉनिकल्स ऑफ नार्निया’वर आधारित आहे. ही कहाणी दोन मुले, डिगोरी आणि पॉली यांची आहे. हे दोघेही सर्वप्रथम ‘वुड बीटविन द वर्ल्डस’ (नार्निया)चा शोध घेतात.
लेड जेपेलिनचे गाणे ‘स्टेयरवे टू हेवन’च्या धूनवर निर्मित या ट्रेलरची सुरुवात डॅनियल क्रेगचे पात्र एंड्य्रू केटरली (कहाणीचा मुख्य जादूगार आहे)च्या ‘कधी-कधी एक कहाणीच उर्वरित सर्व कहाण्यांची सुरुवात असते’ या संवादाने होते. यानंतर तो मुलांना एक जादुई अंगठी देतो, जी त्यांना वेगवेगळ्या अदभूत आणि काल्पनिक जगतात घेऊन जाते. मुले जादुई जीव आणि प्राण्यांना भेटून अचंबित अन् मंत्रमुग्ध होतात.
चित्रपटात एम्मा मॅकीचे पात्र जॅडिस (जी भविष्यातील व्हाइट विच आणि चार्नची अखेरची राणी होते) आणि फ्लेड्ज (एक बोलणारा अन् उडू शकणार घोडा) सामील आहे. या चित्रपटात डेव्हिड मॅककेना, बीट्राइस कॅम्पबेल, एम्मा मॅकी, कॅरी मुलिगन, सियारान हिंड्स सोबत डॅनियल क्रेक, मेरिल स्ट्रीप, कोबना होल्डब्रुक-स्मिथ, डेनिस गफ आणि सुसान वोकोमा हे कलाकार दिसून येतील. हा चित्रपट 12 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
