For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट...मोदी सरकार जाणार...इंडिया सरकार येणार- बाळासाहेब थोरात

08:15 PM Apr 25, 2024 IST | Abhijeet Khandekar
नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लाट   मोदी सरकार जाणार   इंडिया सरकार येणार  बाळासाहेब थोरात
Advertisement

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात लाट असून देशातील मोदी सरकार जाणार आणि आमचे इंडिया सरकार येणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे. ते आज कोल्हापूरात लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रचारासाठी आले जाहीर सभेपुर्वी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी मोदी सरकारवर हल्ला केला. ते म्हणाले, "उद्या दुसरा टप्प्याचा मतदान होत असून पहिल्या टप्प्यात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाल्याने फार मोठ्या विजयाची अपेक्षा आहे. देशात सध्या एक लाट आलेली असून ती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहे. सध्या देशातील लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण आणि बोलणं अजिबात पटत नाही" असे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

तसेच, पंतप्रधान मोदी यांचं वक्तव्य राजकीय असून त्यांची पातळी खुपच खाली घसरली आहे. ते काँग्रेसचा जाहीरनामा ट्विस्ट करून सांगत आहेत. हे लोकांना समजलं असून मोदी सरकार जात आहे आणि इंडिया सरकार येत असल्याचं त्यांनी स्पष्ट केले.

सांगलीमध्ये आघाडी धर्म पाळणार...
सांगलीमधील राजकिय तिढ्यावर भाष्य करताना बाळासाहेब थोरात यांनी, सांगलीचा विषय संपला असल्याचं स्पष्ट केलं. जागा वाटपामध्ये ठाकरे गटाला ही जागा गेली असल्याने उमेदवार कोण द्यावा हा त्यांचा प्रश्न आहे. पण सांगलीमध्ये आघाडी धर्मपाळावा असे आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सांगितले असून काँग्रेसचे मतदान आघाडीच्या उमेदवारालाच होईल असाही विश्वास त्यांनी स्पष्ट केला.

बंडखोरांवर कारवाईचा निर्णय कमिटीचा...
कोल्हापूरातील बंडावर भाष्य करताना बाळासाहेब थोरात यांनी सावध उत्तर दिले. बंडखोरीवर महाराष्ट्र प्रदेश कमिटीचे अध्यक्ष उत्तर दिले असून त्यासंदर्भात अहवाल दिल्लीला पाठवत आहोत असे उत्तर दिले.

Advertisement
Tags :

.