For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नारायण राणेंना मोठे मताधिक्य देणार !

03:16 PM Apr 26, 2024 IST | अनुजा कुडतरकर
नारायण राणेंना मोठे मताधिक्य देणार
Advertisement

दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून आयोजित मालवण शहर बुथ बैठकीत सर्वानुमते निर्धार

Advertisement

मालवण | प्रतिनिधी

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आमचे दैवत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासाचे श्रेय त्यांचेच आहे. येथील अधिकाधिक विकासासाठी हक्काचे नेतृत्व म्हणून राणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करूया. असा निर्धार मालवणचे माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या मालवण शहर बुथ क्र. 93 च्या बैठकीत सर्वानुमते करण्यात आला.

Advertisement

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्री रवींद्र चव्हाण, भाजप नेते निलेश राणे यांनी भाजप युती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकासनिधी या विभागात उपलब्ध करून दिला. नागरिकांच्या मागणीनुसार यापुढेही अधिकाधिक विकासकामे मंजूर होतील. असा विश्वास दीपक पाटकर यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष तथा मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर, माजी नगराध्यक्ष दीपक पाटकर, माजी आरोग्य सभापती आप्पा लुडबे, भाजप महिला तालुकाध्यक्ष तथा बुथ अध्यक्ष पुजा करलकर, शक्तीकेंद्र प्रमुख प्रमोद करलकर, माजी नगरसेवक जगदीश गांवकर, शिवसेना शहरप्रमुख बाळू नाटेकर यांसह भाजप पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विजय केनवडेकर, सुदेश आचरेकर यांनीही विचार मांडताना राणे साहेबांचा विजय हा मोठ्या मताधिक्याचा असेल असा ठाम विश्वास व्यक्त केला. बुथ स्तरावरील या बैठकीस असलेली उपस्थिती ही एखाद्या सभे प्रमाणे होती. दीपक पाटकर यांचे सामाजिक कार्य कर्तृत्व दर्शवणारी व पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे व संघटितपणे पार पाडताना सर्वाना सोबत घेऊन पुढे जाण्याची तत्परता दर्शवणारी ही बैठक होती.दरम्यान देऊळवाडा, आडवण, सातेरी मंदिर, आडारी, इस्वती, रेडकर हॉस्पिटल मागे हा विभाग नेहमीच राणे साहेबांच्या पाठीशी ठाम राहिला असून प्रत्येक निवडणुकीत मताधिक्य देत आला आहे. यावेळी सर्वाधिक मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार दीपक पाटकर यांसह उपस्थितांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :

.