महायुतीकडून नारायण राणेंची उमेदवारी जाहीर
12:07 PM Apr 18, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
रत्नागिरी येथे उद्या भरणार उमेदवारी अर्ज!
Advertisement
सावंतवाडी : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला महायुतीच्या उमेदवारा बद्दलचा तिडा अखेर सुटला आहे. महायुतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव सिंधुदुर्ग -रत्नागिरी लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर केले आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपची तेरावी यादी मुंबई येथे जाहीर करण्यात आली. या यादीत कोकणातून पहिल्यांदाच सिंधुदुर्ग -रत्नागिरीला भाजपच्या कोट्यातून तिकीट मिळालं असून नारायण राणेंच्या उमेदवारीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते आहे. याच पार्श्वभूमीवर उद्या केंद्रीय मंत्री नारायण राणे हे रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
Advertisement
Advertisement