For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नारायण मूर्तींचा 4 महिन्यांचा नातू बनला अब्जाधीश

06:22 AM Mar 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
नारायण मूर्तींचा 4 महिन्यांचा नातू बनला अब्जाधीश
Advertisement

इन्फोसिस संस्थापकांकडून नातवाला 240 कोटींचे शेअर्स भेट : 1 कोटी 51 लाखांपैकी 15 लाख शेअर्स हस्तांतरित

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आपल्या चार महिन्यांच्या नातवाला अब्जाधीश बनवले. त्यांनी आपला नातू एकाग्र रोहन मूर्ती याला 240 कोटी ऊपयांचे शेअर्स भेट दिले आहेत. हे शेअर्स कंपनीच्या एकूण शेअर्सच्या फक्त 0.04 टक्के आहेत. आजोबांनी दिलेल्या ‘गिफ्ट’मुळे एकाग्र आघाडीच्या आयटी कंपनीतील सर्वात तऊण भागधारक बनला आहे. तसेच एकाग्रचे नाव देशातील सर्वात तऊण अब्जाधीशांच्या यादीत समाविष्ट झाले आहे.

Advertisement

स्टॉक एक्स्चेंजकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी 15 मार्च रोजी नारायण मूर्तीच्या होल्डिंगमधून कंपनीचे 15 लाख शेअर्स एकाग्रला हस्तांतरित करण्यात आले. सध्याच्या बाजारभावावर नजर टाकली तर इन्फोसिसच्या शेअरचा दर 1,600 ऊपयांच्या आसपास आहे. त्यानुसार या शेअर्सची किंमत 240 कोटी ऊपये होते. तथापि, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी आपल्या 1 कोटी 51 लाख समभागांपैकी केवळ 15 लाख शेअर्स हस्तांतरित केले आहेत. आता हे शेअर्स दिल्यानंतर नारायण मूर्ती यांचा कंपनीतील हिस्सा 0.40 टक्क्मयांवरून 0.36 टक्क्मयांवर आला आहे. हस्तांतरण कागदपत्रांमध्ये नारायण मूर्ती यांच्याकडून एकाग्र रोहन मूर्ती याच्याकडे शेअर्स हस्तांतरित केल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. मूर्ती यांनी 1991 मध्ये इन्फोसिसची स्थापना केली होती.

एकाग्रचा जन्म नोव्हेंबरमध्ये

इन्फोसिसचे सर्वेसर्वा नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव रोहन मूर्ती तर मुलीचे नाव अक्षता आहे. मुलगा रोहनचे लग्न अपर्णा कृष्णनशी झाले असून त्यांना एकाग्र हा पुत्र आहे. एकाग्रचा जन्म गेल्यावषी नोव्हेंबरमध्ये झाला होता. रोहनची बहीण म्हणजेच नारायण मूर्ती यांची कन्या अक्षता हिची विवाहगाठ ऋषी सुनक यांच्याशी बांधण्यात आली असून ते सध्या ब्रिटनचे पंतप्रधान आहेत. अक्षता आणि ऋषी सुनक यांना जुळ्या मुली आहेत. गेल्या आठवड्यातच राष्ट्रपतींनी नारायण मूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांना राज्यसभा खासदार म्हणून नामनिर्देशित केले होते.

Advertisement
Tags :

.