For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नारायण कारवेकोप, करिअम्मा देवी प्रसन्न मुरगोड होसूर प्रथम

12:13 PM Apr 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
नारायण कारवेकोप  करिअम्मा देवी प्रसन्न मुरगोड होसूर प्रथम
Advertisement

श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ आयोजित बैलगाडी शर्यतीला उत्स्फूर्त प्रतिसाद : लकी ड्रॉमध्ये गणपती सावंत दुचाकीचे मानकरी, शर्यत पाहण्यास तुफान आबालवृद्धांसह गर्दी

Advertisement

बेळगाव : अनगोळ येथे श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ आयोजित  बेळगाव हिंदकेसरी किताबाचे बैलगाडी शर्यत मोठ्या गटात नारायण कारवेकोप  तर लहान गटात करिअम्मा देवी प्रसन्न मुरगोड होसूर  बेळगाव हिंदकेसरी किताबाचे मानकरी कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच अनगोळ बेळगाव येथे श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ विभाग यांच्यावतीने आयोजित खाली बैलगाडी ओढण्याची भव्य जंगी शर्यत रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली.  ही शर्यत लहान गट व मोठा गट अशी आयोजित करण्यात आली होती. बेळगाव जिल्हा व कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच अनगोळ येथे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही शर्यत आयोजित करण्यात आली होती. अनगोळ येथील मरगाई मंदीर समोरील तलावात मर्यादीत अंतराचा फज्जा  करण्यात आला होता. तर शर्यतीत बैलजोडीची वेळ अचूक टिपण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डीजिटल घड्याळाचा वापर करण्यात आला होता. त्यामुळे बैलजोडी मालक व प्रेक्षकांना बैलजोडी धावलेली वेळेची नोंदणी थेट  पाहण्याची सोय करण्यात आली होती.  तर प्रेक्षकांना बसण्यासाठी पाच ठिकाणी गॅलरीची सोय करण्यात आली होती. त्यामुळे नागरीकांना शर्यत मैदानाच्या सर्व बाजुनी पहावयास मिळत असे त्यामुळे नागरीकांनी फज्जात तुडुंब गर्दी केली होती तर पुरुषांबरोबर महिलांनी ही शर्यत पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.  श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ यांच्या वतीने व्यासपीठावर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करुन आणि पंच कमीटीच्या हस्ते शर्यतीच्या गाड्यांची पुजा करून  सुरवात करण्यात आली. यावेळी बेळगाव जिल्हा, हल्याळ, धारवाड, पश्चिम महाराष्ट्र, चंदगड तालुका, खानापुर तालुका, उत्तर कर्नाटकातील बैलजोड्या मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होता.

स्पर्धेचा निकाल पुढिल प्रमाणे

Advertisement

मोट्या गटातील नारायण लक्ष्मण कार्वेकर यांच्या तेज्या पिस्टन या बैलजोडीने 33-16  मि. सेकंद इतक्या कमी वेळेत अंतिम रेषा पारकरून प्रथम क्रमांक पटकाविला यांना  बजाज जगजंपी यांच्या वतीने 150 सी सी बजाज पल्सर ही दुचाकी देण्यात आली. तर लहान गटात करीअम्मा देवी प्रसन्न मुरगोड होसूर यांच्या आर एक्स सुरी व बादल या बैलजोडीने 33-13 मि. सेकंद इतक्या कमी वेळेत अंतिम रेषापार करून प्रथम क्रमांक पटकाविला यांनाही बजाज जगजंपी यांच्यावतीने 150 सी सी बजाज पल्सर  ही गाडी देण्यात आली. मोठा गट : द्वितीय क्रमांक परशराम मल्लाप्पा पाखरे वडगाव 33-90, तिसरा व चौथा क्रमांक मंगाई देवी प्रसन्न वडगाव व नवलुर नेसरी 34-2, पाचवा क्रमांक वीर अंजनेय प्रसन्न चिंचनुर 34-24,  सहावा क्रमांक नागनाथ प्रसन्न बेकीनकेरी शिवाजी भोगण  34-40, सातवा क्रमांक ज्योतिर्लिंग प्रसन्न हलगा 34-42, आठवा क्रमांक अंजनेय प्रसन्न अलारवाड कालकुंद्री 34-52, नववा क्रमांक नागनाथ प्रसन्न बेकीनकेरी प्रमोद गावडे 34-68, दहावा क्रमांक कलमेश्वर प्रसन्न अनगोळ 34-84, अकरावा क्रमांक महादेव प्रसन्न शिरोली नेसरी  34-93, बारावा क्रमांक ग्रामदेवी प्रसन्न चिंचनुर 34-97, तेरावा क्रमांक नागनाथ प्रसन्न बेकीनकेरी हब्बनट्टी 35-00, चौदावा क्रमांक अवधूत कलमेश्वर प्रसन्न मल्लापूर 35-08, पंधरावा क्रमांक रामलिंग प्रसन्न तडशिनहाळ 35-13, सोळावा क्रमांक कलमेश्वर प्रसन्न कल्लेहोळ 35-18, सतरावा क्रमांक कलमेश्वर बसवेश्वर प्रसन्न बसवण कुडची वाघवडे 35-22, अठरावा क्रमांक चव्हाटा प्रसन्न बेकीनकेरी रामचंद्र बाळेकुंद्री 35-26, ऐकोणीसावा क्रमांक बसवेश्वर प्रसन्न बसरीकट्टी 35-51, वीसावा क्रमांक ब्रम्हलिंग प्रसन्न मासगोंडहट्टी तोपिनकट्टी 35-59, ऐकविसावा क्रमांक सिध्देश्वर प्रसन्न कुदनुर 35-94, बावीसावा क्रमांक महादेव प्रसन्न मलगेवाडी 36-07, तेवीसावा क्रमांक बसवाण्णा प्रसन्न जाफरवाडी बेटगीर 36-25, चोवीसावा क्रमांक नागनाथ प्रसन्न बेकीनकेरी आजरा 36-25, पंचवीसावा क्रमांक चिक्या प्रेमी आजरा 36-42, सहवीसावा क्रमांक रामराजा मंगाई प्रसन्न अतोली 36-43, सतावीसावा क्रमांक माऊली प्रसन्न बेळगुंदी 36-49, अठावीसावा क्रमांक ब्रम्हलिंग प्रसन्न सुळगा हिंडलगा 36-55, एकोणतीसावा क्रमांक कलमेश्वर प्रसन्न सावगाव 36-76, तिसावा क्रमांक कालम्मादेवी प्रसन्न  तोपिनकट्टी 36-83 तर 51 लक्की ड्रॉ विजेती जोडी म्हणून रवळनाथ प्रसन्न कर्ले मुधोळ 39-47  यांनी फटकावला

लहान गट :   द्वितीय क्रमांक सिध्देश्वर प्रसन्न यरमाळ हलगीमर्डी 33- 73, तिसरा क्रमांक दुर्गामाता देवी आदरस्थ शिवोजी प्रसन्न काद्रोळी 33-98, चौथा क्रमांक दुर्गादेवी प्रसन्न हलगीमठ्ठ मुचंडी 34-02, पाचवा क्रमांक मडीवाळेश्वर प्रसन्न बडस के एच संतिबस्तवाड 34-40, सहावा क्रमांक गपारसाहब दुर्गाडी हल्याळ के के कोप 34-94, सातवा क्रमांक करीअम्मा मास्कम्मादेवी प्रसन्न के के कोप 36-14, आठवा क्रमांक लक्ष्मी देवी प्रसन्न शिग्गीहळ्ळी गोकाक 36-45, नववा क्रमांक भावकेश्वरी प्रसन्न कुपटगीरी 36-70, दहावा क्रमांक बसवेश्वर प्रसन्न मासगोंडहट्टी धामणे 37-68, अकरावा क्रमांक  बसवेश्वर प्रसन्न गोविनकोप्प 37-72, बारावा क्रमांक मंगाईदेवी प्रसन्न वडगाव कुदनुर 37-92, तेरावा क्रमांक दुर्गादेवी प्रसन्न हलगीमर्डी 37-94, चौदावा क्रमांक बसवेश्वर प्रसन्न बसवण कुडची 38-03, पंधरावा क्रमांक माऊली प्रसन्न बाकनुर बंबरगा 38-37, सोळावा क्रमांक सद्गगुरु सदानंद प्रसन्न बडाल अंकलगी 37-81, सतरावा क्रमांक कलमेश्वर बसवेश्वर प्रसन्न बसवण कुडची 38-99, अठरावा क्रमांक दुर्गादेवी प्रसन्न वासकोटी  माणगाव 39-40, ऐकोणीसावा क्रमांक बसवेश्वर प्रसन्न गुंजाळ 39-59, वीसावा क्रमांक अंजनेय प्रसन्न अबलापुर 40-12, एकवीसावा क्रमांक मसणाई देवी प्रसन्न नेसरी 40-56,  बावीसावा  क्रमांक विभागुन ग्रामदेवता कुमारी हडलगे  व तेवीसावा क्रमांक दुर्गम्मादेवी प्रसन्न होण्याळ 49-68,  चोवीसावा क्रमांक चाळोबा प्रसन्न मुडेवाडी खानापुर 41-59, पंचवीसावा क्रमांक हुलवीर प्रसन्न मलगेवाडी 41-64 यानी विजेतेपद पटकाविले. लकी ड्रॉ विजेती जोडी म्हणून नागनाथ प्रसन्न बेकीनकेरी यांनी फटकावला.

यावेळी शर्यत कमिटीच्यावतीने प्रेक्षकांच्यासाठी ही आकर्षक इलेक्ट्रॉनिक दुचाकी वाहन लक्की ड्रॉ माध्यामातून ठेवण्यात आली होती आणि या लक्की ड्रॉचे विजेता वडगाव संभाजीनगर येथील गणपती फकिरा सावंत हे भाग्यशाली ठरले. रात्री स्पर्धा संपल्यावर बक्षीस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जगजंपी बजाजचे प्रमुख मल्लिकार्जुन जगजंपी, श्रीराम सेना हिंदुस्थानचे राष्ट्रीय अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर, डॉ मनजीत जैन, कपिल भोसले, सागर पाटील, अमर अकनोजी, प्रकाश चौगुले, वल्लभ गुणाजी, स्वप्नील भिंगार्डे, रोहीत धाकलुचे, शरद पाटील, उमेश चौगुले, अमित देसाई,  उमेश कुऱ्याळकर, बाळू कुऱ्याळकर, मनोज चवरे, गुंडू गुंडप्पणावर, श्रीकांत कुऱ्याळकर, शाम गौंडाडकर आदी उपस्थित होते. अनगोळ यांच्यावतीने पहिल्यांदाच अनगोळ येथे संपुर्ण कर्नाटक व पश्चिम महाराष्ट्राच्या इतिहासातील प्रचंड मोठ्या बक्षिसांची बैलगाडी शर्यत ठेवण्यात आल्याने ही शर्यत पाहण्यासाठी नागरीकांनी गर्दी केली. शर्यत पाहण्यासाठी खास प्रेक्षक गॅलरी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड भव्य बक्षीस, आकर्षक मैदान, एलईडी क्रीन, हलगीचा ठेका, उत्कृष्ट समालोचन आकर्षक फटाक्यांची आतषबाजी केली. बेळगाव जिह्यातील शर्यत प्रेमी नागरीकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने संपूर्ण मैदान तुडुंब भरले होते यावेळी महिलावर्ग ही शर्यत पाहण्यासाठी मैदानात मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी गावातील शेतकरी बांधव, पंच कमिटी, हौशी बैलजोडी मालकांनी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ही शर्यत पार पाडण्यासाठी अथक परिश्रम घेतले. यावेळी युवराज पाटील, भावेश बिर्जे यांनी संपुर्ण शर्यतीचे समालोचन केले.

Advertisement
Tags :

.