नाओमी ओसाका पराभूत
06:42 AM Jan 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वृत्तसंस्था / पर्थ
Advertisement
येथे सुरू असलेल्या युनायटेड चषक सांघिक टेनिस स्पर्धेत जपानची नाओमी ओसाका हिला ग्रीसच्या सॅकेरीकडून एकेरीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. या सामन्यात खेळताना ओसाकाची तब्बेत पूर्णपणे तंदुरुस्त नव्हती. तिला सर्दी, खोकला आणि ताप आला होता. त्यामुळे तिची या सामन्यात खेळताना पूर्ण दमछाक झाली होती.
ग्रीसच्या मारिया सॅकेरीने या सामन्यात ओसाकाचा 6-4, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव केला. 18 जानेवारीपासून मेलबोर्नमध्ये सुरू होणाऱ्या नव्या वर्षातील पहिल्या ऑस्ट्रेलियन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेत आपण खेळण्यास पूर्णपणे तंदुरुस्त राहीन, असे ओसाकाने सांगितले. युनायटेड चषक सांघिक स्पर्धेत दुसऱ्या एकेरी सामन्यात ग्रीसच्या सित्सिपसने जपानच्या मोचीझुकीवर 6-3, 6-4 अशा सेटमध्ये मात करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली.
Advertisement
Advertisement