नाणूस-वाळपई येथे शौचालयाची भिंत कोसळून दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
02:47 PM Aug 10, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
वाळपई : नाणूस-वाळपई येथे घरातील शौचालयाची भिंत अचानक कोसळून दीड वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, चिमुकल्याला घराच्या परिसरात बसवून त्याची आई घरातील इतर कामांमध्ये व्यस्त होती. त्याचवेळी शौचालयाची भिंत अचानक कोसळली आणि त्याखाली चिमुकला अडकला. या दुर्घटनेत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, नाणूस परिसरात शोककळा पसरली आहे.
Advertisement
Advertisement