‘द पॅराडाइज’मध्ये नानी चित्रपटाचे चित्रिकरण सुरू
दाक्षिणात्य स्टार नानीचा आगामी चित्रपट ‘द पॅराडाइज’ चर्चेत आहे. श्रीकांत ओडेलाच्या दिग्दर्शनातील या चित्रपटावरून आता नवी माहिती समोर आली आहे. नानीच्या या बहुप्रतीक्षित चित्रपटाचे चित्रिकरण सुरू झाले आहे. नानी आणि श्रीकांत ओडेला यांचा एकत्रित हा दुसरा चित्रपट आहे. हैदराबादमध्ये या चित्रपटाचे चित्रिकरण 40 दिवस चालणार आहे.
निर्मात्यांनी या चित्रपटाशी निगडित एक छायाचित्र शेअर केले आहे. यात कुणाचा चेहरा दिसत नसून केवळ एक पाय दिसून येत आहे. पायांमध्ये ब्रेसलेटसारखे काहीतरी पडलेले आहे आणि समोर एक शहर अन् काही झोपडपट्ट्या दिसून येत आहेत. ‘द पॅराडाइज’ हा चित्रपट 26 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपट हिंदीसमवेत एकूण आठ भाषांमध्ये तेलगू, तमिळ, कन्नड, मल्याळी, बांगला, इंग्रजी आणि स्पॅनिशमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे. नानी अलिकडेच ‘हिट 3’मध्ये दिसून आला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत श्रीनिधी शेट्टी मुख्य भूमिकेत होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला होता.