नंदिनी दूध महागणार
प्रतिलिटर 8 रुपये दरवाढीला संमती : राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय
त. भा. प्रतिनिधी/ बेंगळूर
नंदिनी दुधाच्या विक्री दरात प्रतिलिटर 8 ऊपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. मात्र, विधानपरिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार निवडणूक आयोगाकडे या दरवाढीसंबंधी परवानगी मागणार आहेत. आयोगाची मंजुरी मिळाल्यास 1 नोव्हेंबरपासून नवीन दर लागू होण्याची शक्मयता आहे. मंगळवारी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्त्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
पशुखाद्य, चारा, औषधोपचार आणि देखभाल खर्च वाढल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक दर देण्याची मागणी दूध संघांनी केली होती. त्यानुसार प्रतिलिटर 8 ऊपयांची वाढ करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, जिल्हा व तालुका पंचायत निवडणुकांबाबतही बैठकीत चर्चा झाली असून आरक्षणाच्या अंतिम प्रक्रियेनंतर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका घेण्याचा सरकारचा विचार आहे. त्यानंतर सुमारे 15 दिवसांनी ग्रामपंचायत निवडणुका घेण्याची तयारी असल्याचे मंत्री ईश्वर खंडे यांनी सांगितले.
बेंगळुरात पाच पोलीस आयुक्तालयांना मंजुरी
ग्रेटर बेंगळूर प्राधिकरणाच्या पार्श्वभूमीवर बेंगळूर शहर पोलीस आयुक्तालयाचे पाच स्वतंत्र आयुक्तालयांमध्ये विभाजन करण्यास मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण आणि मध्य अशी पाच आयुक्तालये असतील. यासाठी 1,022 नवीन पदे निर्माण करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
न्यायव्यवस्थेच्या डिजिटलायझेशनसाठी 704 कोटी ऊपयांच्या योजनेला मंजुरी, ‘युवा आपद मित्र’ योजनेतील 10,350 स्वयंसेवकांना प्रत्येकी 10 हजार ऊपयांचे आपत्कालीन प्रतिसाद किट देण्यासाठी 10.35 कोटींची तरतूद, तसेच 2022 चा क्रिमिनल लॉ अमेन्डमेंट विधेयक मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तर कर्नाटकातील 9,600 पात्र महिलांना संकरित गाय किंवा सुधारित म्हैस खरेदीसाठी 25 टक्के अनुदान देण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.
फॉर्म-7 संदर्भातील प्रकरणांवरही मंत्रिमंडळात चर्चा झाली. विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल झालेल्या एफआयआरच्या तपासासाठी स्वतंत्र एसआयटी स्थापन न करण्याचा निर्णय घेण्यात आला असून राज्य पोलीसच कायद्यानुसार या प्रकरणांचा तपास करणार आहेत. याशिवाय सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील दुकानांमध्ये ई-पॉस, इलेक्ट्रॉनिक वजनकाटे आणि आयरिस स्कॅनर बसविण्यास मंजुरी देण्यात आली. याचबरोबर 800 नवीन ँए-न्न्घ् बसेस खरेदी करण्यासाठी सुमारे 304 कोटी ऊपयांच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली.
