निरवडे येथील रेकॅार्ड डान्स स्पर्धेत नंदिनी बिले प्रथम
न्हावेली / वार्ताहर
महापुरुष उद्योग समुह निरवडे आरोस तिठा हरि वारंग आयोजित जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेत कारिवडे येथील नंदिनी बिले हिने प्रथम क्रमांक पटकावला.द्वितीय क्रमांक पूर्वा मेस्री ( कणकवली ) तृतीय क्रमांक गुरुनाथ तुळसकर ( तुळस ) तर उत्तेजनार्थ दुश्यम परब व निधी खडपकर ( मळगाव ) यांना मिळाला. विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देण्यात आले. स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी व्यासपीठावर रेन्कोज कोकणात बंगल्याचे मालक सुधीर राणे,जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठान चे अध्यक्ष राजू मसुरकर,सोनुर्ली सरपंच नारायण हिराप,पर्यटन व्यावसायिक नंदू तारी,श्री मडुरकर,माजी मुख्याध्यापक गोविंद मोर्ये,माजी ग्रामपंचायत सदस्य नागेश गावडे,दांडेली पोलिस पाटील चतुर मालवणकर,बाबल सावळ,संजय तानावडे,संभाजी माळकर,सुर्यकांत माळकर,आदी मान्यवर उपस्थित होते.या स्पर्धेचे परिक्षक म्हणून साईश निपाणीकर ( म्हापसा गोवा ) व मृणाल सावंत ( कुडाळ ) यांनी काम पाहिले.