For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दुष्काळ पाहणीसाठी गेलेल्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी दिले काजू-बदाम; आधी अल्पोपाहार, मग निवेदन

06:25 PM Sep 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
दुष्काळ पाहणीसाठी गेलेल्या कृषीमंत्र्यांना शेतकऱ्यांनी दिले काजू बदाम  आधी अल्पोपाहार  मग निवेदन
Advertisement

नांदेड : मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून पिके करपण्याच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नांदेड जिल्ह्यात दुष्काळग्रस्त भागाची पाहणी केली.

Advertisement

यावेळी शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांची भेट घेत आपल्या विविध मागण्यांची निवेदने सादर केली. विशेष म्हणजे, नांदेड जिल्हा नियोजन सभागृहातील दुष्काळी परिस्थितीवरील आढावा बैठकीदरम्यान काजू-बदामाचा आस्वाद घेतल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर दुष्काळ पाहणीदरम्यान शेतकऱ्यांनी कृषीमंत्री भरणे यांना प्रतिकात्मक स्वरूपात बशीतून काजू-बदाम दिले आणि त्यानंतर आपली निवेदने सादर केली.

पावसाअभावी पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, पीक परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात, तसेच शासनाने दुष्काळी उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात, अशा मागण्या शेतकऱ्यांनी यावेळी मांडल्या.

Advertisement

दरम्यान, आढावा बैठकीतील काजू-बदामाच्या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेवरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर शेतकऱ्यांनी कृषीमंत्र्यांना काजू-बदाम देत आपल्या व्यथा आणि मागण्यांकडे लक्ष वेधल्याचे पाहायला मिळाले.

Advertisement
Tags :

.