For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ओबीसींना फसविले की मराठ्यांना? भाजपचे रामराज्य नव्हे तर, रावण राज्य; नाना पटोलेंचा टोला

06:30 PM Jan 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
ओबीसींना फसविले की मराठ्यांना  भाजपचे रामराज्य नव्हे तर  रावण राज्य  नाना पटोलेंचा टोला
Nana Patole
Advertisement

शिंदे- फडणवीस सरकारने मराठा समाजाला आरक्षण कशा पद्धतीने दिले याचं स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे या आरक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली आहे. असे सांगून सरकारने आरक्षण देताना नेमके कोणाला फसवले आहे ?ओबीसींना फसविले की मराठ्यांना असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. तसेच भाजपचे सरकार हे रामराज्य़ नसून रावणराज्य असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर महाराष्ट्राच्या विभागाचा जिल्हानिहाय आढावा बैठक आयोजित केली होती. बैठकीपुर्वी माध्यमांशी संवाद साधताना नाना पटोले यांनी सरकारवर निशाणा साधला.

यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले, "पहिला प्रश्न हा आहे कि, मनोज जरांगे- पाटील यांच्या उपोषणस्थळी महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री का गेले नाहीत ? तसेच जणगणनेच्या आधारावर आरक्षण द्यायला पाहीजे पण मराठा समाजामध्ये केवळ संभ्रम निर्माण करण्याचे काम शिंदे- भाजप सरकारने केले आहे. तसेच हे आरक्षण देताना ओबीसी आणि मराठा समाजापैकी कोणाला कसे आणि किती आरक्षण दिले याचे स्पष्टीकरण सरकारने द्यायला हवे. मराठा आरक्षण देताना सरकारकडून फसवाफसवीचे राजकारण होत आहे. त्यामुळे हे फसवे सरकार आहे. आरक्षणाचा अध्यादेश फडणवीस यांनीही काढला होता, तेच आताही केले आहे." असाही टोला नाना पटोले यांनी सरकारला लगावला आहे.

Advertisement

पुढे बोलताना नाना पटोले म्हणाले, "भाजपचे नेते ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, त्यांनाच आपल्या पक्षात प्रवेश देतात. हीच भाजपची नीती असून भाजपचे नेते स्वताला रामापेक्षा मोठे झाल्याच्या अविर्भावात आहेत. त्यांच्याकडून मूळमुद्दे सोडून इतर मुद्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे. भाजपचे राज्य हे रावणाच्या राज्यापेक्षाही वाईट राज्य आहे. उत्तर प्रदेशची पध्दत मुंबईतील मीरा रोडवर आणली जात आहे. रामाच्या आधारावर देशाचे विभाजन करण्याचा प्रयत्न काँग्रेस कधीही खपवून घेणार नाही." असा इशाराही नाना पटोले यांनी दिला.

Advertisement
Tags :

.