For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Malkapur News | मलकापूरचं 'मंगलपूर' नामकरण तूर्तास स्थगित; नगरपरिषदेचा मोठा निर्णय

04:51 PM Jul 08, 2026 IST | NEETA POTDAR
malkapur news   मलकापूरचं  मंगलपूर  नामकरण तूर्तास स्थगित   नगरपरिषदेचा मोठा निर्णय
Advertisement

मलकापूर -मलकापूर शहराचे मंगलपूर असे नामकरण करण्याबाबतचा 25 जून रोजी ठराव करण्यात आला होता . मात्र याबाबत शहरातील  जनमताचा आदर करून  बुधवार 8 जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वांनुमते या ठरावाला स्थगिती देण्यात आली .

Advertisement

पुढील तीन महिने या ठरावावर कोणतीही कारवाई केली जाणार नाही असे प्रतिपादन नगराध्यक्षा रश्मी शंतनू कोठावळे यांनी विशेष सर्वसाधारण सभे प्रसंगी केले .

      मलकापूर शहराचे नामकरण मंगलपूर असे करणेबाबत मलकापूर नगर परिषदेत ठराव करण्यात आला होता .याबाबत जनमत आजमवल्यानंतर मलकापूर नगर परिषदेच्या वतीने विशेष सर्व साधारण सभेच आयोजन करण्यात आलं होतं .

Advertisement

नगराध्यक्षा रश्मी कोठावळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा संपन्न झाली . यावेळी मुख्याधिकारी चेतन माळी यांची प्रमुख उपस्थिती होती .

Advertisement
Tags :

.