For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेळगाव-चिकोडी मतदारसंघासाठी पाच उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठीकडे

06:55 AM Feb 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेळगाव चिकोडी मतदारसंघासाठी  पाच उमेदवारांची नावे पक्षश्रेष्ठीकडे
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव लोकसभा मतदारसंघातून दोन, चिकोडी मतदारसंघातून तीन उमेदवारांची नावे निश्चित करून हायकमांडला यादी पाठविण्यात आली आहे. उमेदवारांची यादी हायकमांडला पाठविणे एवढेच आपले कर्तव्य आहे, असे जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.

कणकुंबी येथे शनिवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. आपल्या कुटुंबातील कोणताही सदस्य या निवडणुकीत उमेदवार म्हणून सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले. बेळगाव व चिकोडी मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. अधिक लोकप्रिय असणाऱ्या दोघा उत्तम उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेले उमेदवार केवळ आपल्या समाजामध्येच नाही तर इतर समाजामध्येही लोकप्रिय असावे लागणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

अपघात रोखण्यासाठी जागृती आवश्यक

बेळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या तीन आठवड्यात अपघातांच्या घटनांत 25 जणांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी पोलीस खाते, आरटीओ, अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन जागृती निर्माण करण्याचे काम केले पाहिजे. राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा आहे. सर्व्हिस रोड आहेत. मात्र राज्य महामार्गांवर तशी परिस्थिती नाही. त्यामुळे अपघाताचे प्रमाण रोखण्यासाठी जनजागृती करणे आवश्यक आहे.

Advertisement
Tags :

.