भारत विरुद्ध इंग्लड कसोटी सामन्याच ट्राफीचे नांवात बदल
पतौडी ट्राफी येवजी तेंडुलकर -अँडरसन ट्रॉफीचे नांव
वृत्तसंस्था/ इंग्लंड
भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे या दौऱ्यात 20 जूनपासून 5 सामन्यांची कसोटी मलिका खेळवली जाणार आहे. आता या कसोटी मालिकेचे नाव बदलण्यात आले आहे.टीम इंग्लंड दौऱ्यावर खेळवण्यात येणारी कसोटी मालिका पूर्वी पतौडी टॉफी म्हणून ओळखली जात होती, मात्र आता हे नाव बदलण्यात आले आहे.इसीबीने पतौडी कुटुबाला एक पत्र लिहून ही टॉफी निवृत करत असल्याची माहिती दिली आहे.या मलिकेत एक नवीन देण्यात आले आहे, हे जागतिक क्रिकेटमधील दोन महान खेळाडूचे नांव आहेत या मध्ये भारताच देव म्हणून ओळखले जाणरे सचिन तेंडूलकर आणि इंग्लडचा नांमवत खेळाडू जेम्स अॅडरसन यांच्या नावावर असणार आहे.
भारतीय माजी फंलदाज सचिन तेंडुलकर दीर्घकाळ जागतिक क्रिकेटर वर्चस्व गाजवलेले आहे, तसेच जेम्स अॅडरसनने वेगवान गोलंदाज म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नोदवेले आहेत.या दोघचे सन्मानार्थ भारत आणि इंग्लंड यांच्यातील आगामी कसोटी मलिका आता तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफी म्हणून ओळखली जाणार आहे.या ट्रॉफीचा पहिला सामना 20 जून रोजी हेडिंग्ले मैदानावर हेणार आहे.