महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ज्ञानवापी तळघराच्या छतावर नमाज सुरू राहणार

06:25 AM Sep 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ज्ञानवापी प्रकरणात हिंदू पक्षाला झटका, याचिका फेटाळली : व्यास तळघरात नमाज पठणाला बंदी घालण्यास नकार

Advertisement

वृत्तसंस्था/ वाराणसी

Advertisement

काशी विश्वनाथ मंदिराशेजारील ज्ञानवापी मशिदीबाबत सुरू असलेल्या कायदेशीर खटल्यात हिंदू पक्षाला मोठा धक्का बसला आहे. वाराणसी न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणावर सुनावणी करताना व्यास तळघराच्या छतावर नमाज अदा करण्यावर बंदी घालण्याबाबतची याचिका फेटाळली आहे. याचा अर्थ मुस्लीम समुदाय नमाज पठण सुरू ठेवतील. याचबरोबर तळघरात दुऊस्ती करण्यासही न्यायालयाने परवानगी नाकारली आहे.

ज्ञानवापी खटल्यात, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग हितेश अग्रवाल यांच्या न्यायालयाने तळघर कस्टोडियन डीएम वाराणसी यांना कोणत्याही प्रकारच्या दुऊस्तीचे आदेश देण्यास नकार दिला. यासोबतच हिंदू पक्षाची याचिकाही फेटाळण्यात आली. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान मुस्लीम पक्षाचा आक्षेप आणि प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. तसेच यथास्थिती कायम ठेवण्यात आली आहे. जानेवारीमध्ये न्यायालयाच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार मिळाल्यानंतर व्यासजींनी एका संस्थेच्या वतीने याचिका दाखल केली होती. या याचिकेत व्यासजींच्या तळघराच्या छतावर मुस्लिमांना नमाज पठणापासून रोखण्याची मागणी करण्यात आली होती.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews
Next Article