नक्ष यड्डी यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड
11:07 AM Nov 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेळगांव-शिंदोळी येथील बेलगाम पब्लिक स्कूलचा विद्यार्थी नक्ष यड्डी याची राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय शालेय 17 वर्षाखालील वयोगटातील बुध्दिबळ स्पर्धेत नक्षने प्रथम क्रमांक पटकाविला. सदर स्पर्धेत बेळगांव जिह्यातून मुन्नोळी बेळगांव शहर, बेळगांव ग्रामीण, खानापूर, कित्तूर, बैलहोंगल, सौंदती व रामदुर्ग तालुक्यातून 40 स्पर्धक सहभागी झाले होते. अंतिम सामन्यात नक्षने अप्रतिम खेळ करून प्रतिस्पर्ध्यावर मात केली. त्याला डॉ. शिवकुमार रेवशेट्टी, मुख्याध्यापिका राजश्री रेवशेट्टी, श्रीदेवी सी. व्ही., सुनील हिरेमठ, तसेच शट्टू पाटील, आदर्श जी., विष्णू सुकतेकर, नागेश यड्डी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
Advertisement
Advertisement