For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

३० ऑक्टोबरला झळकणार ‘नखरेवाली’

07:00 AM Oct 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
३० ऑक्टोबरला झळकणार ‘नखरेवाली’
Advertisement

तेरे इश्क में आणि तनु वेड्स मनु रिटर्न्स यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे प्रख्यात दिग्दर्शक आनंद एल. राय यांचा नवा चित्रपट ‘नखरेवाली’च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर झाली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल शंकल्या यांनी केले आहे. तर जियो स्टुडिओज, आनंद एल. राय आणि हिमांशु शर्मा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर याची कहाणी दिव्य निधी शर्मा यांनी लिहिली आहे. रोमँटिक कॉमेडी चित्रपट ‘नखरेवाली’ 30 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रेम, नातेसंबंध, महिला-पुरुषांच्या भूमिकेला नव्या शैलीत सादर करण्यात आल्याचा दावा निर्मात्यांनी केला आहे.  चित्रपटाच्या पोस्टरवर ‘कभी-कभी प्यार में मजनू को भी लैला बनना पडता है’ अशी टॅगलाइन असून ती नात्यांच्या पारंपरिक पद्धतींमध्ये एक मजेशीर बदलाचा संकेत देणारी आहे. नखरेवाली चित्रपट हलक्या-फुलक्या आणि मनोरंजनाच्या शैलीत महिलांची सुरक्षा आणि समाजाशी निगडित मुद्द्यांवर चर्चा करण्याचा प्रयत्न करतो. हा चित्रपट ‘कहाणीत असे मुद्दे मंडतो, जे विचार करण्यास भाग पाडतात. नखरेवाली चित्रपट नातेसंबंध आणि लैंगिक समानतेच्या आजच्या काळातील दृष्टीकोनासह ह्यूमर आणि इमोशनचा उत्तम मिलाप असल्याचे निर्मात्यांचे सांगणे आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.