For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाकासिमा, टिफोई उपांत्य फेरीत

06:47 AM Aug 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
नाकासिमा  टिफोई उपांत्य फेरीत
Advertisement

झेकच्या बेजलिकची विजयी घोडदौड कायम

Advertisement

वृत्तसंस्था, सिनसिनॅटी

एटीपी आणि डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या सिनसिनॅटी खुल्या 1000 दर्जाच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या विभागात ब्रेडाँन नाकासिमा आणि  टिफोई या दोन अमेरिकन खेळाडूंनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे तसेच महिलांच्या विभागात झेकच्या 20 वर्षीय सारा बेजलिकची विजयी घोडदौड कायम राहिली असून तिने साबालेंकानंतर अमेरिकेच्या मॅडिसन किजला पराभवाचा धक्का दिला.

Advertisement

पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अमेरिकेच्या टिफोईने इटलीच्या लोरेंझो मुसेटीचा 7-6 (7-2), 7-5 असा पराभव करत शेवटच्या चार खेळाडूंत स्थान मिळविले. हा सामना दोन तास चालला होता. दुसऱ्या एका सामन्यात अमेरिकेच्या नाकासिमाने आपल्याच देशाच्या सहाव्या मानांकीत टेलर फ्रित्झचा 7-6 (9-7), 4-6, 6-3 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. नाकासिमाने अलिकडच्या कालावधीत सलग चार 1000 दर्जाच्या मास्टर्स टेनिस स्पर्धेत उपांत्यफेरी गाठली आहे. आता टिफोई आणि नाकासिमा यांच्यात आतापर्यंत झालेल्या सामन्यात टिफोईने सहावेळा तर नाकासिमाने केवळ एकदा विजय मिळविला आहे.

महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत झेकच्या 20 वर्षीय सारा बेजलिकने अमेरिकेच्या मॅडिसन किजचा 3-6, 6-4, 7-6 (7-5) असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. अमेरिकेच्या कोको गॉफने युक्रेनच्या कोस्ट्युकचा 6-2, 6-2 अशा सरळ सेटमध्ये फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली आहे. बेजलिक आणि गॉफ यांच्यात उपांत्य फेरीचा सामना होईल.

Advertisement
Tags :

.