कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत नैतिक मोरजकर प्रथम

12:50 PM Nov 20, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

न्हावेली /वार्ताहर
मळगाव येथील स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ट महाविद्यालय बांदाचा विद्यार्थी नैतिक निलेश मोरजकर याने प्रथम क्रमांक पटकाविला. तर मळगाव इंग्लिश स्कूल मळगावची विद्यार्थिनी हर्षिता सहदेव राऊळ हिने द्वितीय क्रमांक पटकाविला.राधारंग फाउंडेशन सिंधुदुर्गच्यावतीने स्व. सौ अनुराधा अनिल ( हरी ) तिरोडकर स्मृती प्रित्यर्थ मळगाव इंग्लिश स्कूल मळगाव प्रशालेच्या चिंतन, हेमंत, शैलजा परब सभागृहात या स्वरचित काव्य वाचन स्पर्धेचे आयोजन करण्यात होते. राधारंग फाउंडेशन संस्था जिल्ह्यात सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. विविध स्पर्धा, सामाजिक व शैक्षणिक उपक्रम, वैद्यकीय मदत, आरोग्य शिबिरे, स्पर्धा परीक्षा असे अनेक उपक्रम संस्थेच्या माध्यमातून राबविले जातात. दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी ही काव्य वाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. "पाऊस"* हा स्पर्धेतील कवितेचा विषय होता. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सरस्वती मातेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर राधारंग फाऊंडेशनचे अध्यक्ष हेमंत खानोलकर, माड्याची वाडी मुख्याध्यापक दीपक सामंत, मळगाव इंग्लिश स्कूल मळगावचे मुख्याध्यापक एम. बी. फाले, राधारंग फाऊंडेशनचे सदस्य अरुणा सामंत, प्रथमेश नाईक, खजिनदार सचिन सामंत, सदस्य गुरुनाथ नार्वेकर, परीक्षक शंकर प्रभू मंगल नाईक-जोशी पालक व शिक्षक, मार्गदर्शक आदी उपस्थित होते.स्पर्धेचा उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे- स्पर्धेत प्रथम- नैतिक निलेश मोरजकर खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ट महाविद्यालय बांदा, द्वितीय क्रमांक कु.- हर्षिता सहदेव राऊळ, मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव, तृतीय - कु.. गौरी राजन गावडे, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कास नं, १, उत्तेजनार्थ - कु. सानवी सचिन देसाई - खेमराज मेमोरीयल इंग्लिश स्कूल व डॉ. व्ही. के. तोरसकर कनिष्ट महाविद्यालय बांदा यांनी यश मिळविले. प्रथम क्रमांकास रोख रु. १५००/- व चषक, द्वितीय क्रमांकास रोख रु.१०००/- व चषक, तृतीय क्रमांकास रोख रु. ७००/- व चषक व उत्तेजनार्थ क्रमांकास रोख रु. ५००/- व चषक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
# tarun bharat sindhudurg # news update # konkan update #
Next Article