For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

‘राका’ चित्रपटात नाइला ग्रेवाल एटलीच्या चित्रपटात मिळाली संधी

06:05 AM Aug 06, 2026 IST | Tarun Bharat Portal
‘राका’ चित्रपटात नाइला ग्रेवाल एटलीच्या चित्रपटात मिळाली संधी
Advertisement

फिल्ममेकर एटली नवा चित्रपट ‘राका’ घेऊन येत आहेत. या चित्रपटात अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत असणार आहे. तर बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदूकोन यात नायिकेची भूमिका साकारत आहे. आता या चित्रपटाशी नाइला अग्रवालही जोडली गेली आहे.

Advertisement

नाइलाने एटलीचे कौतुक करत तो वेगळ्या प्रकारची कहाणी मांडण्याच्या शैलीवर काम करत असल्याचे उद्गार काढले आहेत. इतक्या मोठ्या चित्रपटाला मूर्त रुप देण्यासाठी जितकी मेहनत आवश्यक आहे तितकी तोच करू शकतो असेही तिने म्हटले आहे.

नाइला ग्रेवाल

Advertisement

बॉलिवूडमध्ये स्वत:च्या 11 वर्षांच्या कारकीर्दीनंतर ‘राका’मधून दक्षिणेत पदार्पण करत आहे. राका चित्रपटाची संधी मिळताच मी एटलीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती, असे नाइलाने म्हटले आहे. 2015 साली इम्तियाज अली यांचा चित्रपट ‘तमाशा’द्वारे

बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी नाइला अलिकडेच ‘मामला लीगल है’च्या सीझन 2 मध्ये वकिलाच्या भूमिकेत दिसून आली होती.

यात तिच्यासोबत रवि किशन, निधि बिष्ट, अनंत जोशी आणि अंजुम बत्रा हे कलाकार दिसून आले होते.

Advertisement
Tags :

.