नाईकांचा पुन्हा शिंदेंना इशारा
महायुती सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आणि नवी मुंबईच्या राजकारणातील सर्वेसर्वा गणेश नाईक यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माझ्या नादाला लागू नका , असा इशारा दिला आहे.ऑपरेशन टायगरनंतर शिंदे यांचे दिल्लीतील वजन वाढल्याची चर्चा होती,त्यामुळे भाजपकडून शिवसेनेला डिवचण्याचे उद्योग काही काळ थांबले होते,मात्र आता नाईक यांनी एकनाथ शिंदेंना इशारा देत पुन्हा महायुतीतील धुसफुस चव्हाट्यावर आणली आहे.
गणेश नाईक हे नवी मुंबईच्या राजकारणातील प्रभावशाली नेतफत्व मानले जाते. अनेक दशकांपासून त्यांचे या भागात स्वत:चे मजबूत राजकीय वर्चस्व निर्माण केले आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी गेल्या पाच ते सहा वर्षात राज्यात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.शिंदे हे भाजपचे वरीष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या गुडबुकमध्ये असल्याने शहांच्या माध्यमातून प्रसंगी भाजपला शह देण्याचा शिंदेंनी वेळोवेळी प्रयत्न केला.महापालिका, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप हा संघर्ष टोकाला गेल्याचे बघायला मिळाला, सातारा जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवडणुकीत पालकमंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना बाजूला ठेवत भाजपने आपला नाट्यामयरित्या अखेरच्या क्षणी खेळी करत भाजपचा जिल्हा परिषद अध्यक्ष, आणि त्यात विशेष म्हणजे अध्यक्ष कोण तर शिवसेना शिंदे गटाच्या आमदाराची पत्नीच भाजपने अध्यक्ष म्हणून बसवली,विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा विषय इतका गाजला की उपसभापती निलम गोऱ्हे यांनी सातारा पोलीस अधिक्षकाच्या निलंबनाची केलेली घोषणा मागे घेण्यात आली, असे बोलतात की याच निर्णयामुळे भाजपकडून पुन्हा गोऱ्हे यांच्या उपसभापतीपदाला विरोध झाला,भाजप आणि शिवसेना एकत्र सत्तेत असली तरी त्यांचा स्थानिक पातळीवरील संघर्ष हा कायम दिसतो,मात्र शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते असलेल्या एकनाथ शिंदे यांना त्यांचेच कधी काळी शिवसेनेतील असलेले सहकारी गणेश नाईक यांनी सातत्याने लक्ष्य केले, महायुतीचे राज्यात सरकार आले, त्या सरकारमध्ये नाईक हे मंत्री झाले, आणि शिंदे यांना मुख्यमंत्री पदावऊन उपमुख्यमंत्रीपद मिळाले,त्यानंतर शिंदे यांना नाईक यांच्याकडून सातत्याने विरोध केला जाऊ लागला,कधी ठाण्यात जाऊन नाईक यांनी जनता दरबार घेतला, तर कधी एकनाथ शिंदे यांची जागा भविष्यात तुरूंगात असेल, असे सातत्याने वक्तव्य कऊन नाईक यांनी शिंदेंवर सातत्याने टीका केली,नाईक आणि शिंदे यांच्या संघर्षाचे खरे मूळ कारण हे ठाणे जिह्याचे पालकमंत्री तसेच त्यांच्याकडे असलेले नगरविकास खाते जे राज्यातील नगरपालिका आणि महापालिका यांच्याशी संबंधित महत्त्वाचे खाते मानले जाते, गणेश नाईक हे काँग्रेस - राष्ट्रवादीच्या काळात राज्यात मंत्री असताना ठाण्याचे पालकमंत्री होते,ठाण्यातील अनेक महापालिकांवर राष्ट्रवादीचे नेते असलेल्या नाईकांचे वर्चस्व होते, शरद पवारांनी नाईक यांना दिलेली राजकीय ताकद यामुळे एकाच वेळी गणेश नाईक राज्यात मंत्री, त्यांचे सुपुत्र संजीव नाईक हे खासदार, दुसरे चिरंजीव संदिप नाईक हे आमदार तर पुतणे सागर नाईक हे नवी मुंबईचे महापौर होते, मात्र 2014 नंतर राज्यात भाजपची लाट आली, त्यानंतर नाईकांचे ठाण्यातील वर्चस्व कमी झाले, त्यातच आता पुन्हा मंत्री झाल्यानंतर नाईक यांना ठाण्याऐवजी बाजूच्या पालघर जिह्याचे पालकमंत्री पद मिळाले, त्यामुळे नाईक यांची ही राजकीय अस्वस्थता बघता त्यांच्याकडून सातत्याने शिंदे यांना लक्ष्य केले जात आहे, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत तर नाईक यांनी ठाण्याची निवडणूक भाजपने स्वबळावर लढवावी अशी मागणी केली होती, नवी मुंबई महापालिकेतील अनेक कार्यक्रमांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाण्याचे पालकमंत्री असताना देखील कधी शिंदे यांना निमंत्रण दिले जात नाही, तर कधी शिंदेंचे नावच निमंत्रण पत्रिका किंवा कोनशिलेवर नसते,त्यामुळे शिवसेनेकडून सातत्याने नाराजी व्यक्त केली जाते,नाईक शिंदेंच्या विरोधात आक्रमक होत असल्याने त्यांना शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्वगृही परतण्याचा सल्ला देताना, शिंदेंच्या विरोधात बळ देण्याचे जाहीर वक्तव्य केले होते, शिंदेंवर सातत्याने केल्या जाणाऱ्या वक्तव्याचा विरोध करताना गणेश नाईक यांच्या भ्रष्टाचाराची शिंदेंच्या शिवसेनेकडून पोलखोल केली गेली, नाईक यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीही करण्यात आली, त्यामुळे नवी मुंबईतील एखादा महत्त्वाचा निर्णय झाल्यावर वनमंत्री गणेश नाईक विऊद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा संघर्ष चांगलाच पेटल्याचे पाहायला मिळतो. नाईक यांनी सातत्याने शिंदे यांना लक्ष्य केले, मात्र शिंदे यांनी नाईकांना कधी उत्तर दिले नाही, श्रीकांत शिंदे यांनी मात्र ज्या घरात तीन तीन जणांना जनतेने माजी केले त्यांच्याविषयी आपण काय बोलणार ? अशा खोचक शब्दात नाईकांना उत्तर दिले होते. शिंदे यांच्याकडे असलेल्या नगरविकास खात्याच्या माध्यमातून शिंदेंनी क्लस्टरच्या माध्यमातून तसेच एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीच्या माध्यमातून इमारतींच्या विकासाचा प्लॅन आणला, त्याला नाईक यांनी टोकाचा विरोध केला,राजकारणात मतभेद असणे स्वाभाविक असते, पण ते सार्वजनिक वक्तव्यांतून व्यक्त होऊ लागले की त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. गणेश नाईक यांच्या इशाऱ्याचे पुढे नेमके काय पडसाद उमटतात आणि एकनाथ शिंदे किंवा महायुतीचे इतर नेते त्यावर काय भूमिका घेतात, हे बघणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
प्रवीण काळे