नायब सिंग सैनी हरियाणाचे नवे मुख्यमंत्री ! आज होणार शपथविधी
नायबसिंग सैनी हे हरियाणाचे नवे मुख्यमंत्री होणार असून त्यासंबंधीची माहीती भारतीय जनता पक्षाने आज दिली आहे. हरियाणा राज्यामध्ये बदलत जाणाऱ्या राजकिय घडामोडीमध्ये पुर्वाश्रमीचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर आणि उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर हरियाणा सरकार कोसळले पण काही तासांतच नायबसिंह सैनी यांनी राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांची भेट घेऊन बहूमताचा दावा केला. नायबसिंह सैनी आज सायंकाळी राज्यपालांकडून मुख्यंमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.
हेही वाचा >>> हरियाणामध्ये राजकिय भुकंप! मनोहरलाल खट्टर यांचा राजीनामा
हरियाणामधील ओबीसी आणि इतर मागासवर्गीय समुदायातील एक प्रभावशाली व्यक्ती म्हणून नायब सैनी यांना ओळखलं जातं. कुरुक्षेत्र या मतदारसंघतून भाजपचे लोकसभा खासदार असणाऱ्या सैनी यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी स्विकारली होती.
लोकसभा आणि राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका नजरेसमोर ठेऊन भाजपच्या केंद्रिय नेतृत्वाने हरियाणा राज्यामध्ये बदल घडवले असून यापुर्वी गुजरात आणि उत्तराखंड राज्यातील निवडणुकांपूर्वीही अशाच प्रकारचे राजकिय प्रयोग करून दोन्ही ठिकाणी मोठा विजय मिळवला होता.