For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

नागपूर पदवीधरमध्ये मोठा ट्विस्ट! अभिजित वंजारींची 2,400 मतांची आघाडी; भाजपची धाकधूक वाढली

09:22 PM Oct 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
नागपूर पदवीधरमध्ये मोठा ट्विस्ट  अभिजित वंजारींची 2 400 मतांची आघाडी  भाजपची धाकधूक वाढली
Advertisement
नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीत मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे उमेदवार अभिजित वंजारी यांच्यात सुरू असलेल्या अटीतटीच्या लढतीत आता काँग्रेसने आघाडी घेतल्याची माहिती समोर येत आहे. ताज्या अपडेटनुसार, अभिजित वंजारी यांनी मतांची पिछाडी भरून काढत तब्बल 2,400 मतांची आघाडी घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता वाढली आहे.

नागपूर पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी सुमारे 30 तासांपासून सुरू असून, प्रत्येक फेरीसोबत निवडणुकीचे चित्र बदलताना दिसत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भाजपचे सुधाकर कोहळे यांनी आघाडी घेतली होती. त्यांच्या समर्थकांकडून विजयाच्या जल्लोषाची तयारीही सुरू करण्यात आली होती. मात्र, मतमोजणी पुढे सरकताच कोहळे यांची आघाडी कमी होऊ लागली आणि आता काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी आघाडी घेतल्याची माहिती समोर आली आहे.

Advertisement

बुधवारी सायंकाळनंतर कोहळे यांच्या आघाडीत मोठी घट झाली. सुमारे चार हजार मतांची आघाडी कमी होत ती जवळपास 1,200 मतांपर्यंत खाली आल्याचे वृत्त होते. त्यानंतरच्या मतमोजणीत वंजारी यांनी मुसंडी मारत आघाडी घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात भाजपची कसोटी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपूरमध्येच भाजपच्या उमेदवाराला मिळत असलेली कडवी झुंज राजकीयदृष्ट्या महत्त्वाची ठरत आहे. सुरुवातीला आघाडीवर असलेल्या कोहळे यांना आता काँग्रेसच्या वंजारी यांच्याकडून जोरदार आव्हान मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे.

Advertisement

दरम्यान, अद्याप सुमारे 10 हजार मतांची मोजणी बाकी असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अंतिम निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. उर्वरित मतमोजणीत कोण बाजी मारणार आणि नागपूर पदवीधर मतदारसंघात विजयाचा गुलाल कोण उधळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.