काँग्रेस नेते सुनील केदार यांना पाच वर्षांची शिक्षा; नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात दोषी
काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री सुनील केदार यांना जिल्हा न्यायालयाने 5 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळा प्रकरणात त्यांना आज सकाळी दोषी ठरवण्यात आले असून आज साडेचार वाजता हि शिक्षा सुनावण्यात आली आहे.
2001 ते 02 दरम्यान झालेला हा घोटाळा झाला होता. त्यात सुनिल केदार हे मुख्य आरोपी आहेत. सुनील केदार बँकेच्या अध्यक्षपदी असताना मुंबई, कोलकाता आणि अहमदाबाद येथील अनेक बनावट कंपन्यांनी बँकेतून रोखे खरेदी केले होते. या सरकारी रोख्यांची किंमत त्यावेळी १२५ कोटी रुपये होती.
या कंपन्यांनी बँकेचे सरकारी रोखे बुडवलेच आणि बँकेची मुळे रक्कमही परत केली नसल्याने गुन्हे अन्वेषण विभागाने सुनिल केदार यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्यानंतर प्रलंबित असणाऱ्या या खटल्याची सुनावणी काही दिवसापुर्वी सुरु झाली होती.
आज सकाळी नागपूर जिल्हा न्यायालयाने सुनिल केदार यांच्याविरोधात आरोपांची पडताळणी करून त्यांनी आरोपी सिद्ध केले. त्यानंतर दुपारी साडेचारच्या दरम्यान त्यांच्यावर आरोपपत्र दाखल होऊन त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुनिल केदार यांच्या शिक्षेने राज्य काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.