नागणसूर-हैद्रासह अक्कलकोट रेल्वे परिसरात जोरदार पाऊस; शेतकऱ्यांना दिलासा
05:49 PM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
जेऊर प्रतिनिधी : नागणसूर, हैद्रा तसेच अक्कलकोट रेल्वे स्टेशन परिसरात सोमवारी सायंकाळी पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाने हजेरी लावली. अचानक झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने त्रस्त नागरिकांना, शेतकरी वर्गाला काहीसा दिलासा मिळाला.
Advertisement
सुमारे तासभर झालेल्या जोरदार पावसामुळे परिसरातील अनेक रस्त्यांवर तसेच सखल भागात पाणी साचले. अचानक आलेल्या पावसामुळे काही काळ जनजीवनावर परिणाम झाला. अक्कलकोट रेल्वे स्टेशन परिसरातही पावसाची जोरदार सर सुरू होती.
दरम्यान, या पावसामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळाला असून, खरीप पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. पावसामुळे पिकांना आवश्यक ओलावा मिळण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
Advertisement
Advertisement