त्रिंबकचे माजी सरपंच नागेश सकपाळ यांचे निधन
मालवण । प्रतिनिधी
मालवण तालुक्यातील त्रिंबक बागवेवाडी येथील माजी सरपंच नागेश सिताराम सकपाळ वय ८२ वर्ष, यांचे शनिवार दि.४ जानेवारी रोजी रात्रीं १० : ३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. अतिशय शिस्तबद्ध, हुशार व कर्तव्यदक्ष म्हणुन प्रसिध्द असलेले कट्टर शिवसैनिक कै. नागेश सिताराम सकपाळ यांनी, १९७५ पर्यंत मुंबईत सलुन व्यवसाय केला. त्रिंबक परीसरात १९७६ ते २००० या कालावधीत तसेच त्रिंबक सरपंच पदावर असतानाही अनेक विकासकामे केलीत. १९७६ पासून ग्रामीण भागाचा विचार करुन त्यांनी लायटींग व स्पिकर व्यवसाय केला. त्यावेळी गरीबी असल्याने परीस्थितीनुसार एखाद्याला मोफत स्पिकर सेवा देलेली.त्यामुळे त्यांनी मालवण तालुक्यात एक आदर्श व्यक्ती म्हणुन ओळख निर्माण केली होती . नागेश सकपाळ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, पुतणे, सुना, मुली, जावई, भाऊ, बहिंणी नातवंडे असा मोठा परीवार आहे. त्रिंबक पोलीस पाटील श्री सिताराम उर्फ बाबू सकपाळ यांचे वडील तर डाॅ. सिध्देश सकपाळ त्रिंबक यांचे काका होत.