For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भाजपच्या राष्ट्रीय संघटकपदी नागेंद्र नाथ त्रिपाठी

06:23 AM Jun 02, 2026 IST | Tarun Bharat Portal
भाजपच्या राष्ट्रीय संघटकपदी नागेंद्र नाथ त्रिपाठी
Advertisement

भाजप अध्यक्ष नवीन यांच्याकडून नियुक्ती :  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी

Advertisement

वृत्तसंस्था नवी दिल्ली

भाजपने संघटनात्मक संरचनेला नव्याने मजबूत करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.  अलिकडेच 4 प्रमुख राज्यांमध्ये नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त केल्यावर सोमवारी पक्ष नेतृत्वाकडून आणखी एक मोठा निर्णय घेण्यात आला. भाजप अध्यक्ष नितिन नवीन यांनी वरिष्ठ नेते नागेंद्र नाथ त्रिपाठी यांची पक्षाचे नवे राष्ट्रीय संघटक म्हणून नियुक्ती केली आहे. या नियुक्तीपूर्वी त्यांनी बिहार आणि झारखंडमध्ये क्षेत्रीय संघटन महामंत्री म्हणून कार्य केले आहे.

Advertisement

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले नागेंद्रनाथ त्रिपाठी यांना प्रसिद्धीच्या झोतापासुन दूर राहत पक्षसंघटनेला धार देणारा नेता म्हणून ओळखले जाते. त्रिपाठी यांनी दीर्घकाळापर्यंत बिहार आणि झारखंडचे क्षेत्रीय संघटन महामंत्री म्हणून दोन्ही राज्यांमध्ये पक्षाचा आधार मजबूत केला आहे. याचबरोबर त्यांनी सुमारे 8 वर्षांपर्यंत उत्तरप्रदेशातही भाजपचे प्रदेश संघटन महामंत्री म्हणून धुरा सांभाळली आहे. त्यांचा हाच दीर्घ संघटनात्मक अनुभव पाहता आता त्यांना राष्ट्रीय स्तरावर मोठी भूमिका सोपविण्यात आली आहे.

नागेंद्र नाथ त्रिपाठी हे माध्यम किंवा सार्वजनिक व्यासपीठांवर फारसे दिसून आले नसले तरीही भाजपची अंतर्गत रणनीति, मोठ्या बैठका आणि महत्त्वपूर्ण संघटनात्मक निर्णयांमध्ये त्यांचे मत नेहमीच अत्यंत प्रभावी ठरत राहिले आहे.

अभाविप ते राष्ट्रीय संघटकापर्यंत प्रवास

शालेय जीवनापासून संघाशी जोडले गेलेले त्रिपाठी यांनी एक समर्पित प्रचारक म्हणून काम करताना संघटनात्मक संरचना उभी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. संघानंतर त्यांनी अभाविपमध्ये विविध पदांवर काम केले, जेथे त्यांचे नेतृत्व आणि संघटन कौशल्याची प्रचिती दिसून आली. त्यांचे कौशल्य पाहता 2003 साली त्यांना उत्तरप्रदेश भाजपचे संघटन महामंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले होते. त्यानंतर 2021 मध्ये त्यांना बिहार अन् झारखंडचा क्षेत्रीय संघटन महामंत्री नियुक्त करण्यात आले होते. संघटनेच्या दृष्टीकोनातून हे पद अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण क्षेत्रीय संघटन महामंत्रीवर संघ अन् भाजपदरम्यान उत्तम ताळमेळ राखणे, निवडणूक अभियानाचा आराखडा तयार करणे आणि राज्यांमध्ये पक्षाची व्याप्ती वाढविण्याची मोठी जबाबदारी असते.

Advertisement
Tags :

.