मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेत नागेंद्र मडिवाळला रौप्य
12:14 PM Nov 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
बेळगाव : बेंगळूर येथे युआयबीएफएफ आयोजित मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावचा शरीरसौष्ठवपटू नागेंद्र मडिवाळ याने या गटात रौप्य पदक पटकावित यश संपादन केले आहे. या स्पर्धेत नागेंद्र मडिवाळ हा पहिला खेळाडू आहे ज्याने मिस्टर वर्ल्ड स्पर्धेत चमक दाखविली आहे. नागेंद्र मडिवाळने या स्पर्धेत भाग घेवून आपल्या गटात रौप्य पदक पटकावित यश संपादन केले आहे. मेन्स क्लासीक गटात त्याने रौप्य पदक पटकाविले. त्याने या केलेल्या कामगिरीमुळे राज्य व बेळगाव जिल्ह्यात तो चमकला आहे.
Advertisement
Advertisement