For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Khashaba Teaser झुंजार खाशाबा, अंगार खाशाबा...अजय - अतुलच्या ढोल ताशांचा गजर अन् नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन...खाशाबाचा टिझर पाहाच

05:46 PM Jul 02, 2026 IST | RAHUL SADOLIKAR
khashaba teaser झुंजार खाशाबा  अंगार खाशाबा   अजय   अतुलच्या ढोल ताशांचा गजर अन् नागराज मंजुळेंचं दिग्दर्शन   खाशाबाचा टिझर पाहाच
Advertisement

बहुचर्चित आणि बहुप्रतक्षित खाशाबा चित्रपटाचा टिजर नुकताच रिलीज झाला असून चित्रपटाची गोष्ट आणि संगीत लोकप्रिय होणार याची एक झलक प्रेक्षकांना दिसली असं प्रतिक्रियांमधून दिसत आहे. युट्युबवर रिलीज झालेल्या २ मिनिटे १० सेकंदाच्या या टिझरमध्ये अनेक दिग्गज कलाकार दिसतात. 

Advertisement

खाशाबा जाधवांची गोष्ट

ऑलंम्पिक स्पर्धेत कुस्तीमध्ये देशातील पहिलं पदक मिळवणारे महान कुस्तीगीर म्हणून खाशाबा जाधव यांचे नाव घेतले जाते. १९५२ साली हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिक स्पर्धेत खाशाबा जाधव यांनी पहिले व्यक्तीगत पदक मिळवले होते त्यापूर्वीही १९४८ सालच्या लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी ६ व्या क्रमांकापर्यंतची मजल मारली होती. नागराज मंजुळे दिग्दर्शित खाशाबा हा चित्रपट खाशाबा जाधव यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवासाची गोष्ट आहे.

Advertisement

दिग्गज दिसणार

टिझरमध्ये खाशाबा जाधव यांची भूमीका साकारणारा अभिनेता दिसत नसला तर  सहाय्यक भूमीकेत अनेक नावाजलेले कलाकार दिसतात. यात प्रामुख्याने महेश मांजरेकर, गिरीश कुलकर्णी, जितेंद्र जोशी, छाया कदम, ओम भूतकर, संदीप कुलकर्णी, वैभव मांगले, आणि स्वत: नागराज मंजुळे पारंपारिक धनगरी वेशभुषेत दिसत आहेत.

[embedyt] https://www.youtube.com/watch?v=q6uHkXJR9qU[/embedyt]

टिझरमध्ये संभाजीराजे छत्रपती 

रिलीज झालेल्या या टिझरमध्ये कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती हेही गाडीतून उतरताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटात ते कोणत्या भूमीकेत गेस्ट अपियरन्स म्हणून  दिसणार याचीही चर्चा सोशल मिडीयावर होताना दिसत आहे. 

अंगावर येणारे पार्श्वसंगीत

अंगावर येणारे पारंपारिक ढोल - ताशांचे संगीत आणि झुंजार खाशाबा अंगार खाशाबा या गीताचे बोल अंगावर शहारे आणणारे असल्याच्या प्रतिक्रिया युट्यूबवर रिलीज झालेल्या या टिझरसाठी येत आहेत. सिनेमाचं शूट ब्रिटीश काळ दाखवण्यात यशस्वी झालेलं दिसतं. रिलीज झालेल्या टिझरमध्ये ब्रिटीश काळातील महाराष्ट्र दाखवण्याचं आव्हान   दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सहज पेलल्याचे दिसत आहे.

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित खाशाबा 

नागराज मंजुळे दिग्दर्शित या चित्रपटाची गेले कित्येक काळ सोशल मिडीयावर चर्चा होत आहे. १ जानेवारी २०२७ साली प्रदर्शित होणार असला तरी प्रेक्षकांच्या उत्कंठा ताणवून धरण्यात टिझरला यश मिळाले आहे असं नक्कीच म्हणता येईल.

Advertisement
Tags :

.