कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Kolhapur News: नागावचा अग्निवीर चंदीगढमध्ये हुतात्मा, युद्ध सरावावेळी दुर्घटना

04:52 PM Sep 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

या घटनेने कुटुंबीय, नातेवाईकांसह गावावर शोककळा पसरली आहे

Advertisement

इस्पुर्ली : नागाव (ता. करवीर) येथील अग्निवीर विजय विलास कराडे (वय 23) हे चंदीगडमध्ये युद्धसरावावेळी हुतात्मा झाले. याची माहिती समजताच कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. या घटनेने कुटुंबीय, नातेवाईकांसह गावावर शोककळा पसरली आहे.

Advertisement

2022 मध्ये झालेल्या भरती प्रक्रियेत पहिल्याच प्रयत्नात विजय कराडे याने यश संपादन केले होते. सैन्यभरतीत निवड होऊन तो नागाव गावातून अग्निवीर म्हणून दाखल होणारा पहिला जवान ठरला होता. भटिंडा (चंदीगड) येथे तो सेवा बजावत असताना युद्धसरावावेळी अपघात झाला.

यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विजयवर उपचार सुरू असताना त्याने अखेरचा श्वास घेतला. विजय गणेशोत्सवात सुट्टीसाठी घरी येणार होता. मात्र क्रॉसकंट्री स्पर्धेत सहभाग निश्चित झाल्याने तो गावाकडे येऊ शकला नाही. त्यानंतर दिवाळीत घरी येण्याचे त्याचे ठरले होते; परंतु नियतीला काहीतरी वेगळेच मंजूर होते.

या घटनेने संपूर्ण गाव शोकसागरात बुडाला आहे. त्याच्या पश्चात आई, वडील, भाऊ तसेच आजी, आजोबा असा परिवार आहे. विजयवर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात तयारी सुरू असून मंगळवारी सकाळी शाहू दूध संस्थेसमोरील मैदानावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#agniveer#chandigarh#Indian Army#ispurli_news#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedianagav
Next Article