महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

नागल-ड्रवीस्की पहिल्याच फेरीत पराभूत

06:22 AM Jul 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ बॅस्टड, स्वीडन

Advertisement

भारताच्या सुमित नागल व त्याचा पोलंडचा जोडीदार कॅरोल ड्रेवीस्की यांचे नॉर्डिया ओपन 250 टेनिस स्पर्धेत दुहेरीतील आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले.

Advertisement

सुमित नागल-ड्रेवीस्की यांना फ्रान्सच्या अलेक्झांडर म्युलर व लुका व्हान अॅसशे यांच्याकडून 59 मिनिटांच्या खेळात 3-6, 4-6 असा पराभव पत्करावा लागला. एकेरीत मात्र सुमितने दुसरी फेरी गाठली असून त्याची लढत अर्जेन्टिनाच्या मारियानो नॅव्होनशी होणार आहे.

जर्मनीतील हॅम्बुर्ग येथे सुरू असलेल्या हॅम्बुर्ग ओपन एटीपी स्पर्धेत अनुभवी रोहन बोपण्णा व एन. श्रीराम बालाजी यांचा पहिल्या फेरीतील सामना गुरुवारपर्यंत लांबणीवर टाकण्यात आला. त्यांची लढत जर्मनीच्याच जेकब श्नायटलर व मार्क वॉलनर यांच्याशी होणार आहे. बोपण्णा-बालाजी ही जोडी पॅरिस ऑलिम्पिकमध्येही दुहेरीत खेळणार आहे. याच स्पर्धेत एन. जीवन व विजय सुंदर प्रशांत या भारतीय जोडीने पात्रता फेरीतील दुसऱ्या लढतीत विजय मिळवित मुख्य ड्रॉमध्ये स्थान मिळविले आहे. एका सेटची पिछाडी भरून काढत त्यांनी स्पेनच्या सर्जिओ मार्टोस व जॉमे मुनार यांच्यावर 4-6, 6-2, 10-8 अशी मात केली. मुख्य ड्रॉमधील पहिल्या फेरीत त्यांचा मुकाबला जर्मनीच्या द्वितीय मानांकित टिम पुट्झ व केविन क्रॅवीट्झ या जोडीशी होणार आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article