नागा चैतन्यने शोभितासोबत थाटला संसार
अभिनेता नागा चैतन्य आणि अभिनेत्री शोभिता धुलिपाला हे विवाहबद्ध झाले आहेत. दक्षिणेतील परंपरेनुसार दोघांनी विवाह केला आहे. नागार्जुन अक्किनेनीचा जेष्ठ पुत्र असलेल्या नागा चैतन्यच्या विवाहसोहळ्याची छायाचित्रे समोर आली आहेत. मागील काही दिवसांपासून शोभिता सातत्याने इन्स्टाग्रामवर स्वत:च्या प्री वेडिंग फंक्शनची छायाचित्रे शेअर करत होती. आता नागार्जुनने या विवाहसोहळ्याची छायाचित्रे शेअर केली आहेत. हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टुडिओत हा विवाहसोहळा पार पडला आहे. हा स्टुडिओ अक्किनेनी यांच्या मालकीचे असून तेथे अनेक दिग्गजांनी या सोहळ्याला हजेरी लावली आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला या नवदांपत्याला त्यांच्या कुटुंबीयांसह अनेक मान्यवरांनी शुभाशीर्वाद दिले आहेत. 38 वर्षीय नागा चैतन्यचा हा दुसरा विवाह आहे. यापूर्वी 2017 मध्ये त्याने दक्षिणेतील दिग्गज अभिनेत्री समांथा रुथ प्रभूसोबत विवाह केला होता. परंतु 2021 मध्ये दोघांनीही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता नागा चैतन्यने 32 वर्षीय अभिनेत्री शोभितासोबत नवा संसार थाटला आहे.