नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला विवाहबद्ध
नागार्जुननी शेअऱ केले नव्या सुनेसोबतचे फोटो
मुंबई
सुपरस्टार नागार्जुन यांचे चिरंजीव नागा चैतन्य आणि शोभिता धुलापाला यांचा विवाह नुकताच पार पडला. या दोघांच्या लग्नातील विविध विधींचे फोटो सोशल मिडीयावर खूप व्हायरल होत आहे. अगदी साखरपुड्यापासून, घरातील विधी, हळद असे अनेक कार्यक्रमाचे खास क्षण प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. फॅन्सना या दोघांच्यातील केमिस्ट्री खूप आवडत आहे.
साऊथ सुपरस्टार नागार्जुन यांनी या नवविवाहीत दाम्पत्याचे फोटो शेअर करत त्यांचे अभिनंदन केले. नागार्जुन यांनी आपल्या नव्या सुनबाईंचे कुटुंबात स्वागत केले. त्यांनी यावेळी असे लिहीले आहे की, शोभिता आणि नागा चैतन्य यांच्या आयुष्यातील हा नवा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि भावनिक क्षण आहे. माझ्या लाडक्या चैतन्यचे खूप अभिनंदन आणि शोभिता तुझे आमच्या घरी स्वागत आहे. तू आमच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन आली आहेस.
नागा चैतन्यचे हे दुसरे लग्न आहे, त्याचे पहिले लग्न अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिच्याशी झाले होते. २०१७ मध्ये हे दोघे विवाहंबधनात अडकले होते. पण अंतर्गत मतभेदामुळे या दोघांनी २०२१ मध्ये घटस्फोट घेतला.