For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नागपंचमी

06:01 AM Aug 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
नागपंचमी
Advertisement

कृष्णानेच कालियाचा पराभव केला. तेव्हा त्याच्या कन्या व बायका श्रीकृष्णाला शरण आल्या. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्यावरून नागपूजा प्रचारात आली, असे अनेक जणांचे मत आहे. श्रावण शुद्ध पंचमी ही नागपंचमी म्हणून उदयास आली. श्रीकृष्णाने कालियाचा नाश न करता त्याला अभय दिले. हे जनांसाठी शिक्षण आहे. नाग, साप यांच्या प्रजातींना संरक्षण मिळावे म्हणून पूर्वजांनी अनेक लोककथा समाजात मांडल्या. भक्तीच्या वाटेवर त्या रुजवल्या. त्यांची मुळे खोलवर जावीत म्हणून प्रयत्न केले.

Advertisement

हिंदू संस्कृतीमध्ये पंचमी ही तिथी विशेष महत्त्वाची मानलेली आहे. ही शुभ तिथी आहे. श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी, भाद्रपदामध्ये ऋषिपंचमी, अश्विन महिन्यात ललितापंचमी, कार्तिकामध्ये पांडवपंचमी, माघामध्ये वसंतपंचमी आणि फाल्गुनात रंगपंचमी. आषाढ शुद्ध पंचमीला वीजपंचमी असे म्हणतात. या दिवशी आभाळात जर वीज चमकली तर पावसाळा चांगला जातो अशी समजूत आहे. पंचमी तिथीला जन्माला आलेले बाळ सुंदर, विद्वान, गुणी असते असे म्हणतात. आद्य शंकराचार्यांचा जन्म पंचमीला झाला. आचार्यांच्या बाबतीत लिहिलेल्या श्लोकात असे म्हटले आहे की शंकराचार्यांची माता आणि पिता यांनी पुत्रप्राप्तीसाठी भगवान शिवाची उपासना केली होती. त्याप्रमाणे ज्या महिन्यात आणि ज्या वारी शिव पृथ्वीवर असतात असे मानले जाते त्या श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला म्हणजेच नागपंचमीला शंकराचार्यांची माता आर्यांबा हिने गर्भधारण केला आणि वैशाख शुद्ध पंचमीच्या दिवशी तिने शंकराचार्यांना जन्म दिला. हे शिवाचे वैभव आहे.

नागपंचमी या सणाची उत्पत्ती कशी झाली? तर ज्या दिवशी श्रीकृष्णाने यमुनेच्या डोहातील कालिया नावाच्या नागाचे मर्दन केले, अर्थात त्याचा पराजय केला तो दिवस पुढे नागपंचमी झाला. संत तुकाराम महाराजांनी श्रीकृष्णाच्या बाळक्रीडेचे अनेक अभंग लिहिले आहेत. श्रीकृष्णाचा चेंडू यमुनेच्या डोहात पडला तेव्हा तो कालियाच्या बायकोपाशी गेला. यमुनेच्या काळ्या डोहात काळा कालिया होता. तो झोपला होता. त्याची बायको जागी होती. तिच्यापाशी कान्हा चेंडू मागायला गेला तेव्हा तो तिला ‘तेज:पुंज रासी’ असा दिसला. तिला वाटले, आपला नवरा कालिया जागा झाला तर? ‘जीव याचा कैसा वाचेल म्हणे नारी । मोहिली अंतरी हरिरूपे?’ हरिरूप बघून तिच्या अंतरी वात्सल्यभाव दाटून आला. तिला वाटले, आपल्या नवऱ्याने म्हणजे कालियाने या बाळाचा जीव घेऊ नये. परंतु झाले उलटेच. कृष्णानेच कालियाचा पराभव केला. तेव्हा त्याच्या कन्या व बायका श्रीकृष्णाला शरण आल्या. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्यावरून नागपूजा प्रचारात आली, असे अनेक जणांचे मत आहे. श्रावण शुद्ध पंचमी ही नागपंचमी म्हणून उदयास आली. श्रीकृष्णाने कालियाचा नाश न करता त्याला अभय दिले. हे जनांसाठी शिक्षण आहे. नाग, साप यांच्या प्रजातींना संरक्षण मिळावे म्हणून पूर्वजांनी अनेक लोककथा समाजात मांडल्या. भक्तीच्या वाटेवर त्या रुजवल्या. त्यांची मुळे खोलवर जावीत म्हणून प्रयत्न केले.

Advertisement

जन्मापासून जो अनुक्षणी सोबत आहे त्या मृत्यूचे भय प्रत्येक प्राणीमात्राला सतावत असते. त्याला दूर लोटण्याचे प्रयत्न साऱ्या जीवसृष्टीचे सुरू असतात. त्यामुळे माणसाचे आणि सापाचे वैर उत्पन्न झाले त्यातूनच सर्पमित्र यांचा उदय झाला. साप फक्त विषारी आहे, तो काही वाघ-सिंहासारखा हिंसक नाही. त्याच्यावर हल्ला झाला तरच तो चावतो. सापाला त्याच्या विषाचा उपयोग भक्ष्य गिळण्यासाठी होतो. ज्या भक्ष्याला साप दंश करतो त्याच्या शरीरात विष गेले की पचनाला उपयोगी अशा अन्नाचे विघटन सुरू होते. साप हा कधीही दूध पीत नाही. लाह्या खात नाही. डुख धरत नाही. इस्टेटीवर येऊन बसत नाही. तो फक्त निसर्गाने सोपवलेली कामगिरी अचूकपणे पार पाडतो. भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेतीचा मुख्य अर्थात प्रधान शत्रू म्हणजे उंदीर. उंदीर शेतात शिरून पिकांची नासाडी करतात. उंदरांची वाढ फार जलद गतीने होते. अरण्यऋषी मारुती चितमपल्ली म्हणतात की, उंदीर इतके चाणाक्ष असतात की शेतामधील ज्वारीबाजरीची कणसे, गव्हाच्या ओंब्या आणि भुईमुगाची रोपे तोडून ती आपल्या बिळात साठवतात. उंदरांच्या बिळात वीस ते पंचवीस किलो धान्य साठवलेले असते. उंदीर, घुशींना त्यांच्या बिळापर्यंत पाठलाग करून पकडणारा सापाशिवाय दुसरा कोणीही प्राणी नाही. म्हणून सापाचे रक्षण झाले पाहिजे. आपल्या आवडत्या दैवतांजवळ साप मोठ्या आनंदाने खेळतात. गणपतीबाप्पाच्या पोटावर साप, तर मांडीखाली उंदीर. शिवाच्या गळ्यात साप भूषण म्हणून मिरवतात, तर विष्णू शेषशायी. मणिपूरमध्ये हिंदू लोक मनसा नावाच्या देवीची पूजा करतात. ही शेषाची बहीण आहे अशी तिथे मान्यता आहे. ती सर्पाचे विष बाधू देत नाही. म्हणून तिला विषहरा असे म्हणतात. नागांची देवालये असतात. अथर्ववेदामध्ये सर्पाच्या कमीत कमी 80-90 जातींचा उल्लेख आला आहे. सर्प हा मानवाचा मित्र आहे हीच त्यात शिकवण आहे.

नागपंचमीचा सण हा अहिंसेची शिकवण देतो. प्राचीन काळी स्त्रियांनी ओव्या गाताना म्हटले आहे की ‘नागपंचमीला नका चिरू भाजीपाला, दया शिकवू हाताला आज सये.’ नागपंचमीला शस्त्र हातात धरायचे नाही. म्हणजे स्वयंपाक करताना स्त्रिया रोजच भाजी चिरणे, कांडण करणे, कुटणे, तवा गरम करणे अशी कामे करत असतात. आपल्या हातून नकळत हिंसा होते म्हणून नागपंचमीच्या दिवशी चुलीवर तवा ठेवायचा नाही. विळी, चाकू, सुरीने भाजी चिरायची नाही. कात्री हातात धरायची नाही. वाटायचं नाही. कुटायचं नाही. वर्षातून एक दिवस तरी आपल्या हाताला दया या गुणाची शिकवण द्यायची. नागपंचमी हा सण स्त्रियांचा खूप आवडता होता. हातात बांगड्या भरायच्या, तळहाताला मेहंदी लावायची आणि मुराळी म्हणून आलेल्या भावाबरोबर माहेरी जायचे. झाडावर बांधलेल्या झोपाळ्यावर झोके घ्यायचे. एक ओवी अशी आहे-‘चला सखियांनो घेऊ झाडावरी झोके, आकाशा देऊ धक्के आपल्या पाया’.. उंच उंच स्वप्नं स्त्रियांनी बघितली.

सापापासून काय शिकावे? तर त्याचे रहस्य तो वारंवार कात टाकतो यात आहे, असे मीमांसातीर्थ श्रीपादशास्त्राr किंजवडेकर म्हणतात. साप दीर्घायुषी असतो. सापावर अभ्यास करणारे संशोधक म्हणतात की सापाची कात हा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे. सापांना कात टाकावीच लागते. काही साप दर महिन्याला, तर काही चार महिन्यांनी कात टाकतात. कात टाकायला त्यांना कधी कधी दोन-तीन दिवस तर कधी आठ-दहा दिवस लागतात. त्या दरम्यान ते अन्न खात नाहीत. एका बाजूला नुसते पडून राहतात. माणसालाही योगाभ्यासाने संपूर्ण शरीर बदलता येते. असे योगी काही जणांना नर्मदापरिक्रमा करताना भेटले आहेत. ज्ञानेश्वरीच्या तेराव्या अध्यायात मनुष्याच्या देहाचा व तो देह ज्याच्या सत्तेने चालतो त्या पुरुषाचा विचार केला आहे. मनुष्यशरीराला क्षेत्र असे म्हणतात. माणूस जेव्हा आत्मस्वरूपाला जाणतो तेव्हा तो जन्म, मृत्यू, जरा या दु:खातून मुक्त होऊन देहात असून सुद्धा मोक्ष मिळवतो.

माऊली म्हणतात, ‘सांडूनी आंगीची खोळी । सर्प रिगालिया पाताळी । ते त्वचा कोण सांभाळी । तैसे जाले ?’ आपल्या अंगावरची कात टाकून सर्पाने बिळात प्रवेश केल्यावर ती त्याची कात कोणी सांभाळावी तसे आत्मस्वरूप जाणणाऱ्या पुरुषाच्या देहाचे झाले आहे.

साप हा दीर्घ श्वसन करतो. पूर्ण श्वास आत घेणे व सोडणे हे माणसाला सापाकडून शिकण्यासारखे आहे. सापाला दृश्य असे कान नसतात. संशोधक असे म्हणतात की साप सर्वांगाने ऐकतो. साप कारणांशिवाय दंश करत नाहीत. माणसाला मात्र दंश करायला कुठलेही कारण लागत नाही. माणसाचे मन हिंसामुक्त झाले की सर्व प्राणीमात्रांविषयी त्याच्या मनात प्रेम दाटून येते एवढे मात्र खरे!

स्नेहा शिनखेडे

Advertisement
Tags :

.