For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नड्डासह इतरांचा राज्यसभेत शपथविधी

07:00 AM Apr 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
नड्डासह इतरांचा राज्यसभेत शपथविधी
Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा आणि राज्यसभेसाठी निवडल्या केलेल्या अन्य पाच नेत्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली आहे. राज्यसभेचे अध्यक्ष आणि भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देवविली. अशोक शंकरराव चव्हाण (महाराष्ट्र), चुन्नीलाल गरासिया (राजस्थान), अनिल कुमार यादव मंदादी (तेलंगणा), सुश्मित देव तसेच नदीमुल हक (पश्चिम बंगाल) अशी इतर सदस्यांची नावे आहेत. नुकत्याच विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकांमध्ये हे सर्व सदस्य निवडून आले आहेत. अशोक चव्हाण हे पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असून ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही होते. भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना महाराष्ट्राच्या विधानसभेतून राज्यसभेत पाठविण्यात आले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश हा मोठ्या चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या पक्षप्रवेशामुळे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडी यांना बळ मिळेल असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. महाराष्ट्रात मतदानाच्या प्रथम टप्प्यापासून सलग पाच टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.

Advertisement
Advertisement

.