चालू महिन्यात पाहता येणार ‘नादानियां’
खुशी-इब्राहिम नवी जोडी मुख्य भूमिकेत
सैफ अली खानचा पुत्र इब्राहिम हा बॉलिवुडमध्ये पाऊल ठेवण्यासाठी तयार आहे. इब्राहिम हा लवकरच खूशी कपूरसोबत नादानियां या चित्रपटात दिसून येणार आहे. हा त्याचा पहिला चित्रपट असून यात तो खूशीसोबत रोमान्स करताना दिसून येईल. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. नेक्स्ट ऑन नेटफ्लिक्स इंव्हेंटमध्ये नादानियांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. हा चित्रपट चालू महिन्यातच प्रदर्शित केला जाणार असल्याची माहिती नेटफ्लिक्सने एका व्हिडिओद्वारे दिली आहे. हा चित्रपट करण जौहरकडून निर्माण करण्यात आला आहे. नादानियां हा चित्रपट रोमान्सवर आधारित आहे. शौना गौतम यांच्या दिग्दर्शनात तयार हा चित्रपट काही नवे दाखविले जाणार असल्याचे दावा करतो. यात इब्राहिम-खुशीसोबत दीया मिर्झा आणि सुनील शेट्टी देखील दिसून येणार आहेत. खुशीचा लवयापा हा चित्रपट फारसा चालला नव्हता. यामुळे खुशीला आता या नव्या चित्रपटाकडून भरपूर अपेक्षा आहेत.