For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एन. एम. एम. एस शिष्यवृत्ती परीक्षेत लौकिक मेस्त्री सिंधुदुर्गात तृतीय

04:51 PM Apr 05, 2025 IST | अनुजा कुडतरकर
एन  एम  एम  एस शिष्यवृत्ती परीक्षेत लौकिक मेस्त्री सिंधुदुर्गात तृतीय
Advertisement

वार्ताहर/कुडाळ
शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये घेण्यात आलेल्या एन. एम. एम. एस शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. तेंडोली येथील परशुराम नाईक मास्तर हायस्कूलचा इयत्ता आठवीचा विद्यार्थी लौकिक भालचंद्र मेस्त्री याने एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती परीक्षेत 113 गुण मिळवून खुल्या प्रवर्गातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तृतीय क्रमांक व शिष्यवृत्ती प्राप्त करण्याचा बहुमान मिळविला आहे.त्याच्या या यशामुळे तेंडोली गावाच्या, प. ना. मा. हायस्कूल व संस्था कोल्हापूर चर्च कौन्सिलच्या नावलौकिकामध्ये भर पडली आहे. विद्यार्थी लौकिक मेस्त्री व त्याचे वडील भालचंद्र मेस्त्री, आई भक्ती भालचंद्र मेस्त्री आणि मार्गदर्शक शिक्षकांचे मुख्याध्यापक शुक्रांत समुद्रे,संस्थेचे सेक्रेटरी दिनानाथ कदम, कार्यकारणी सदस्य, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :

.