For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एन्. एम्. एम. एस् परीक्षेत सांगेली विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे यश

02:54 PM Feb 27, 2026 IST | अनुजा कुडतरकर
एन्  एम्  एम  एस् परीक्षेत सांगेली विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे यश
Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी

Advertisement

सन 2025-26 मध्ये घेण्यात आलेल्या एन्. एम्. एम. एस् परीक्षेत सांगेली माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल यश संपादन केले आहे. प्रशालेतील एकूण आठ विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. एन्. एम्. एम. एस् परीक्षेत कु. समृ‌द्धी संदिप रेमूळकर (127 गुण), कु. समृद्धी सुरेश मेस्त्री (106 गुण), कु. सोहम संजय परब (101 गुण), कु. विजया विठ्ठल सावंत (91 गुण), कु. श्रेया विजय नाईक (84 गुण), कु. प्रथमेश प्रकाश राऊळ (84 गुण), कु. रजत मनोहर रेमूळकर (72 गुण), कु. सुजल सुकाजी सावंत (72 गुण ) या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य रामचंद्र घावरे व इतर शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे सर्व संस्थाचालक, प्रशालेचे प्राचार्य रामचंद्र घावरे, सर्व शिक्षक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.