For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

म्हैसूर दसऱ्याच्या शाही सोहळ्याला प्रारंभ

06:03 AM Oct 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
म्हैसूर दसऱ्याच्या शाही सोहळ्याला प्रारंभ
Koppal Gavi Mutt Sri Gavisiddeshwara Swamiji inaugurated the world-renowned Mysuru Dasara 2026 festival atop Chamundi Hill in Mysuru on Sunday. Chief Minister D.K. Shivakumar, District In-charge Minister Dr. Yathindra Siddaramaiah, and several other state ministers were preset. -KPN ### Mysuru Dasara 2026 inaugurated
Advertisement

जगप्रसिद्ध म्हैसूर दसरा महोत्सवाला रविवारी चामुंडी टेकडीवर पारंपरिक धार्मिक विधींनी सुऊवात झाली. कोप्पळ गविमठाचे पीठाधिपती परमपूज्य श्री अभिनव गवीसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते चामुंडेश्वरी देवीला पुष्पार्चना करून दसरा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यामुळे सांस्कृतिक नगरी म्हैसूरमध्ये 11 दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवाला अधिकृत प्रारंभ झाला.

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर : नंदीध्वज, मंगलवाद्ये, वीरगासे आणि राज्यातील विविध लोककलांच्या पथकांच्या मिरवणुकीतून स्वामीजींसह मान्यवरांचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर चामुंडेश्वरी देवीची विशेष पूजा करण्यात आली. उत्सवमूर्तीला पुष्पार्चना करून दसरा महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला.

Advertisement

म्हैसूर दसरा महोत्सवाचे प्रमुख आकर्षण असलेल्या राजघराण्याच्या खासगी दरबारालाही म्हैसूर राजवाड्यात सुऊवात झाली. युवराज यदुवीर कृष्णदत्त चामराज वडेयर यांनी पारंपरिक राजवेश परिधान करून रत्नजडित सिंहासनावर विराजमान होत खासगी दरबार भरविला. यंदा ते बाराव्यांदा खासगी दरबार भरवत असल्याने या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

परंपरेनुसार कंकणधारणेसह विविध धार्मिक विधी

खासगी दरबारापूर्वी यदुवीर वडेयर, त्यांच्या पत्नी त्रिषिका कुमारी वाडियार आणि पुत्र आद्यवीर यांच्यावर राजघराण्याच्या परंपरेनुसार कंकणधारणेसह विविध धार्मिक विधी करण्यात आले. सिंहासनाची पूजा, पारंपरिक धार्मिक विधी आणि अन्य राजघराण्याच्या प्रथांनंतर शुभ मुहूर्तावर यदुवीर वडेयर सिंहासनावर विराजमान झाले. पादपूजेसह विविध धार्मिक परंपरांनी खासगी दरबाराची शोभा वाढविली.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती

सकाळी 11.50 ते दुपारी 12.13 या शुभ धनुर्लग्नाच्या मुहूर्तावर उद्घाटन सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर, जिल्हा पालकमंत्री डॉ. यतिंद्र सिद्धरामय्या, अन्य मंत्री, आमदार आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. आमदार जी. टी. देवेगौडा यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.

यंदाच्या उद्घाटन सोहळ्यात विविध धर्मांचे धर्मगुरु आणि मठाधीश सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी स्वतंत्र आसनव्यवस्था करण्यात आली होती. मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक उपस्थित राहण्याची शक्मयता लक्षात घेऊन प्रशासनाने कडक पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

विद्युत रोषणाईने उजळली म्हैसूर नगरी

दसरा महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर म्हैसूर राजवाडा, जंबू सवारीचा मार्ग आणि शहरातील प्रमुख रस्ते आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहेत. देश-विदेशातून लाखो पर्यटक म्हैसूरला भेट देण्याची अपेक्षा असून त्यांच्या सोयीसाठी जिल्हा प्रशासनाने विविध व्यवस्था केल्या आहेत.

जात नव्हे, नीती पाहून राज्य घडवा; गवीसिद्धेश्वर महास्वामी

दसरा म्हणजे भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाचा संगम आहे. जात पाहून राज्य घडवू नका, तर नीती पाहून राज्याची उभारणी करा, असे आवाहन श्री गविसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले. म्हैसूर दसरा महोत्सव 2026 च्या उद्घाटन सोहळ्यात आशीर्वचन देताना त्यांनी दसऱ्याचा इतिहास आणि त्यामागील सांस्कृतिक परंपरेचे महत्त्व विशद केले. भाषणाच्या प्रारंभी त्यांनी सुत्तूर मठाच्या स्वामीजींना वंदन करून दसरा महोत्सवाच्या ऐतिहासिक वाटचालीचा उल्लेख केला. कोप्पळचे गंडुगली कुमारराम यांच्यापासून दसरा महोत्सवाची सुऊवात झाली असून तुंगभद्रेच्या तीरावरून हा उत्सव कावेरीच्या तीरापर्यंत पोहोचला, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

.