For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मेक्सिकोच्या जंगलात रहस्यमय माया शहर

07:00 AM Mar 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
मेक्सिकोच्या जंगलात रहस्यमय माया शहर
Advertisement

प्राचीन माया संस्कृतीचे रहस्य जगभराला आकर्षित करत असते. याचमुळे मेक्सिकोच्या घनदाट जंगलांमध्ये या संस्कृतीच्या अवशेषांचा शोध घेतला जात असतो. नव्या शोध मोहिमेदरम्यान तज्ञांना माया संस्कृतीचे एक हरवलेले शहर सापडले आहे. हे शहर 1000 वर्षे जुने असून यात एक 50 फूट उंच पिरॅमिड देखील मिळाले आहे. याचबरोबर एका प्राचीन स्पोर्ट पिच आढळली आहे. हे विशाल शहर पाहून जगभरातील तज्ञ थक्क झाले आहेत. आगामी काळात या शहरामुळे अनेक रहस्यांची उकल होणार असल्याचे मानले जात आहे. माया शहरात अनेक पिरॅमिडसदृश संरचना, भव्य इमारतींसोबत तीन प्लाझा आणि अनेक दगडी स्तंभ सापडले आहेत. कधीकाळी हे शहर हजारो लोकांचे वास्तव्यस्थान होते, असा निष्कर्ष काढला जात आहे. यातील एक पिरॅमिड 82 फूट उंच होता आणि आसपासच्या जंगलाच्या वर दिसून यायचा. या शोधात अनेक उंच वेदी आणि एक प्राचीन क्रीडामैदान हाती लागले असून याचा वापर धार्मिक सोहळ्यांसाठी केला जायचा. ही माया वस्ती ईसवी सन 250 आणि 1000 सालादरम्यानची आहे. हे शहर कालौघात गडप झाले हेते आणि कुणीच याचे अचूक स्थान जाणत नव्हता असे प्रमुख पुरातत्व तज्ञ इवान स्प्रॅज यानी सांगितले आहे.

Advertisement

पहिला बॉलगेम

या स्थळाला ओकोमटुन नाव देण्यात आले आहे. 3000 ते 4000 चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात फैलावलेल्या विशाल भागात एकही ज्ञात पुरातत्व स्थळ नव्हते. ओकोमटुनचा शोध युकाटन प्रायद्वीपच्या कॅम्पेचे क्षेत्रात लावण्यात आला आहे. दक्षिण मेक्सिकोत मेक्सिकोचा उपसागर आणि कॅरेबियन समुद्रादरम्यान हे क्षेत्र आहे. हे क्षेत्र स्वत:च्या घनदाट जंगलासाठी प्रसिद्ध आहे. इवान यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाला या स्थळापर्यंत पोहोचण्यासाठी अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.