For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर तालुक्यात गूढ आवाज; जमीन हादरल्याने नागरिकांत भीती

04:18 PM Oct 15, 2026 IST | Tarun Bharat Portal
सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर तालुक्यात गूढ आवाज  जमीन हादरल्याने नागरिकांत भीती
Advertisement
सोलापूर | प्रतिनिधी अभिजीत जवळकोटे : सोलापूर शहरासह दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप परिसरातील विविध गावांमध्ये आज दुपारी 2 वाजून 48 मिनिटांनी अचानक मोठा गूढ आवाज ऐकू आल्याची घटना घडली. या आवाजासोबतच जमीन हादरल्याचा अनुभव आल्याचे नागरिकांनी सांगितले. या अनपेक्षित घटनेमुळे परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दुपारच्या सुमारास अचानक झालेल्या मोठ्या आवाजामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. आवाज नेमका कशामुळे झाला, याबाबत परिसरात विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. काही नागरिकांनी जमीन व्हायब्रेट झाल्याचेही सांगितल्याने या घटनेबाबत उत्सुकता आणि चिंता वाढली आहे.

Advertisement

दरम्यान, या घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात असल्याचे समजते. मात्र, गूढ आवाजामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच घटनेचे कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.

नागरिकांनी या घटनेबाबत कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.