जमिनीत सापडले रहस्यमय हातगोळे
400 वर्षे जुना इतिहास
चीनच्या भिंतीनजीक खोदकाम करताना पुरातत्व तज्ञांना शस्त्रास्त्रांचा मोठा साठा आढळून आला आहे. यात 400 वर्षे जुने हातगोळे देखील सामील आहेत. या क्षेत्रात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा होता, परंतु कुणालाच याची कल्पना नव्हती असे पुरातत्व तज्ञांनी सांगितले आहे.
पुरातत्व तज्ञांना चीनच्या या भिंतीनजीक खोदकामात सुमारे 59 दगडाचे हातगोळे मिळाले आहेत. हे खोदकाम चीनच्या भिंतीच्या बॅडलिंग सेक्शनच्या पश्चिम दिशेला करण्यात आले आहे. हे ठिकाण राजधानी बीजिंगपासून केवळ 80 किलोमीटर अंतरावर आहे. पहिल्यांदाच चीनच्या भिंतीनजीक उत्खननात अशाप्रकारचा शोध लागला आहे. या शस्त्रास्त्रांचा वापर मिंग शासनकाळातील (1368-1644) सैनिक वापर करायचे अशी माहिती संशोधक शांग हेंग यांनी दिली आहे.
हे दगडी शस्त्र दिसण्यास साधारण असले तरीही याच्या आत दारूगोळा भरण्यासाठी गोलाकार छिद्र आहे. या छिद्रात स्फोटके भरून फेकल्यास भयंकर विस्फोट होऊ शकतो. या शस्त्रास्त्रांच्या भांडाराचा वापर मिंग शासक भिंतीच्या रक्षणासाठी करत होते.
या शस्त्रास्त्रांचा वापर करणाऱ्या सैनिकांसाठी यावर एक संदेशही लिहिलेला आहे. यावर रक्षकांना शत्रूंपासून सावध राहण्यासाठी इशारे लिहिले आहेत. चिनी आर्मीचे पुरातत्व तज्ञ मा लुवेई यांनी भिंतीचे शत्रूंपासून रक्षण करण्यासाठी हँडग्रेनेड आवश्यक होते असे म्हटले आहे. याचमुळे या हातगोळ्यांना दगडांच्या हात छिद्र पाडून त्यात ठेवले होते.
अन्य महत्त्वपूर्ण गोष्टींचाही शोध
पुरातत्वतज्ञांना येथील खोदकामात आणखी अनके महत्त्वपूर्ण गोष्टी मिळाल्या आहेत. सैनिकांना सहजपणे वर चढता यावे आणि तीर सोडण्यासाठी अनेक सुविधाजनक आणि छोट्या भिंती, याचबरोबर प्राचीन काळातील लोकांच्या दैनंदिन जीवनात वापरल्या जाणाऱ्या गोष्टी म्हणजेच अग्निकुंड, स्टोव, भांडी, प्लेट्स, कात्री, फावडे इत्यादी मिळाले आहे.
20 वर्षांपासून संशोधन
चीनच्या या महान भिंतीच्या बॅडलिंगयुक्त हिस्स्यात पहिल्यांदा उत्खनन 2000 साली करण्यात आले होते. तेव्हापासून येथे 110 वेळा उत्खनन करण्यात आले आहे. 2021 मधील उत्खननात या भिंतीच्या निर्मितीविषयी महत्त्वाची माहिती मिळाली आहे.