महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

काँग्रेसच्या हितासाठीच माझे कार्य : अमित पाटकर

12:23 PM Nov 25, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मायकल लोबो यांची विमानात झालेली भेट अनवधानाने..!

Advertisement

पणजी : कर्नाटक राज्यातील बेंगलोर या ठिकाणी कर्नाटकचे उद्योग मंत्री एम. बी. पाटील यांच्या मुलाच्या लग्नासाठी गोव्याचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपल्याला निमंत्रण होते आणि त्यासाठीच आपण लग्नाला उपस्थित राहिलो होतो. दाबोळी विमानतळावर त्याच विमानाने मायकल लोबो हेही बेंगलोर येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आले होते. त्यांची आणि माझी झालेली भेट ही अनवधनाने होती, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ‘तऊण भारत’शी बोलताना सांगितले. अमित पाटकर यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाच्या हितासाठी आणि पक्षाच्या कार्यासाठी आपण कधीच प्रत्यारणा करणार नाही. माझे कार्य हे काँग्रेसच्या हितासाठीच राहिले आहे आणि यापुढेही राहणार आहे. बेंगलोर येथे कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील यांच्या मुलाच्या लग्नासाठी आपण गेलो होतो. त्यामुळे माझ्याच विमानात असलेल्या मायकल लोबो यांच्या भेटीचा अर्थ हा चुकीचा काढू नये, असेही ते म्हणाले. गोव्याचा प्रदेशाध्यक्ष या नात्याने आपण लग्न समारंभासाठी उपस्थित राहिलो. यावेळी काँग्रेसचे इतर वरिष्ठ नेतेही उपस्थित हेते. माजी मंत्री केसी वेणू गोपाल, दिनेश गुंडुराव, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्याशी मी गोव्यातील प्रश्नाविषयी चर्चा केली. तसेच इतर राजकीय आखाडे आणि गोव्याच्या हितासाठी जे निर्णय घेता येतील, त्यासंबंधी आपण बोललो असल्याचे पाटकर यांनी सांगितले.

Advertisement

कर्तव्यापासून दूर हटणार नाही....

गोव्यात काँग्रेस पक्षाचे कार्य वाढविणे आणि सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणे हे माझे परमकर्तव्य आहे. या कर्तव्यापासून आपण कधीच दूर जाणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष पाटकर म्हणाले. येणाऱ्या काळात काँग्रेसशिवाय गोव्यातील जनतेला पर्याय नाही. येणाऱ्या निवडणुकीत त्याचा प्रत्यय येईल, असा विश्वासही पाटकर यांनी व्यक्त केला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article